शेवगाव दंगल प्रकरणी पी.आय. पुजारींची चौकशी करा न्यायालयाचा आदेश...!

शेवगाव दंगल प्रकरण,पी.आय. पुजारींची चौकशी करा न्यायालयाचा आदेश...!
अहमदनगर, ता.२२/०३/२०२४: शेवगाव पोलीस ठाण्याची तात्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसनराव चव्हाण यांच्या विरुद्ध दंगलीचा खोटा गुन्हा दाखल केला होता,चव्हाण यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी चौकशी अर्जामध्ये जिल्हा न्यायाधीश एम.एस. लोणे यांनी पुजारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
शेवगाव 14 मे 2023 रोजी मिरवणुकीत झालेल्या दंगल प्रकरणी तात्कालीन पोलीस निरीक्षक पुजारी विलास यांनी शेवगाव शहरातील अनेक निरापराध लोकांना आरोपी म्हणून दाखवले त्यामुळे अनेकांना तुरुंगवास भोगवा लागला होता, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष चव्हाण हे दंगलीच्या दिवशी कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी होते त्यांना दंगलीच्या गुन्ह्यात आरोपी केले होते चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेऊन आपली बाजू मांडून अटकपूर्व जामीन मिळवला होता.
 चव्हाण यांनी स्वतःची सर्व कॉल डिटेल्स, लोकेशन, पुजारी, मुटकुळे,तात्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, अजित पाटील यांचे 1 ते 16 मे 2023 पर्यंतचे कॉल डिटेल्स शेवगाव पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती मोबाईल कंपनीकडून हस्तगत करून शेवगाव न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
त्यानुसार शेवगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीशांनी चव्हाण यांच्या वकिलामार्फत केलेल्या अर्जाला मंजुरी देत पोलिसांना आदेश दिला होता.
न्यायालयाच्या या निर्णयाने चिडून पुजारी यानी दुसऱ्यांदा त्रयस्त व्यक्तींच्या नावावर असलेले गुन्हे चव्हाण यांच्या नावे दाखवले.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्रतिबंधनात्मक खटला दाखल केला या प्रकरणी चव्हाण यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्याकडे पुन्हा अपील दाखल करत प्रतिबंधनात्मक खटल्याला आव्हान दिले.
 यार्लगड्डा यांनी पुजारी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत ताशेरे उडत अपील मान्य केले होते, चव्हाण यांनी न्यायालयात फौजदारी तक्रार चौकशी अर्ज दाखल केला होता,त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने पी.आय.विलास पुजारी याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
शेवगाव तालुका, अहमदनगर जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून शेवगावचे पी.आय. विलास पुजारी याचे विरोधात अनेक जन आक्रोश मोर्चे व आंदोलने काढण्यात आली होती. न्यायालयाने पि.आय. विलास पुजारी याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने शेवगाव तालुका,अहमदनगर जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाचे आभार व्यक्त केले आहेत.
व पी.आय पुजारी याची सखोल चौकशी होऊन पुजारी याचे दंगली दरम्यान व दंगलीच्या पाच दिवस अगोदरचे व दंगली नंतरचे सर्व कॉल रेकॉर्ड, बँक डिटेल्स तपासले जावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष हरीशदादा चकनारायण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली होती.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....