पोस्ट्स

उ.बा.ठा. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.निरज नांगरे यांचा समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश.

इमेज
  उबाठा सेनेला अखेरचा ' जय-महाराष्ट्र '! नेवाश्यातील शेकडो शिवसैनिकांचा शिंदेसेनेत प्रवेश. नेवासा बातमी : उबाठा गट युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. निरज नांगरे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला. नेवासे : ज्या शिवसैकांनी हडाच काड आणि रक्ताचे पाणी करत पक्षाला अनेक विजय मिळवून दिले आणि कधी पराभवही पत्कारावे लागले मात्र ‘त्या' विजयाचे आणि पराभवाचे साधे कारण ही आम्हाला कोणी कधी विचारले नाही ! आणि आमची कधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही होऊ दिली नाही! अशा पक्षात राहून आमचा काय उपयोग? असा खडा सवाल करत आम्ही या उबाठा पक्षाला जयमहाराष्ट्र करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वासर्व्हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे असे नांगरे यांनी स्पष्ट केले. भेट घेण्यासाठी गेलो असता स्वतः पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वतः आमचे स्वागत केले. त्यामुळे जिथे मान सन्मान आणि कामे होतात तोच खरा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिंदे गटाच्या शिवसेनेत आल्याचे आम्हाला खरे समाधान झाले असल्याची भावना व्यक...

नेवासा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पहिल्या शाखेचे प्रवरासंगम येथे प्रदेशाध्यक्ष सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन.

इमेज
प्रवरा संगम येथे रिपब्लिकन सेना शाखेचे उद्घाटन; बहुजन समाज पक्षाच्या माजी तालुकाध्यक्षांचा रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश....! प्रवरा संगम (ता. नेवासा), दि. 26 जून 2026 : नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे रिपब्लिकन सेनेच्या तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन सेनेच्या शाखेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील कुमार सूर्यवंशी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड तसेच अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे मा.नेवासा तालुकाध्यक्ष हरिषदादा चक्रनारायण यांनी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी व पक्ष संघटनेने कार्यकर्त्यांच्या पाठीशी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे. प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील कुमार सूर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाला रिप...

श्रीरामपुर शहरात धर्माचं विखारी राज'कारण जोमात...!

इमेज
#भीमजन्मोत्सव   श्रीरामपुर शहरात धर्माचं विखारी राज'कारण जोमात असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठी अस्वस्थता पसरलेली होती. राम'रहीमोत्सव  धार्मिक राष्ट्रीय एकात्मतेची देशभर ओळख असलेले सय्यदबाबा उरूस आणि रामनवमी यात्रे दरम्यान झालेला ऱ्हाडा हा इथल्या स्थानिक सर्वसामान्य जनतेला प्रचंड अस्वस्थ करून गेला. वातावरणात मोठी दहशत पसरलेली होती. रामायण या ग्रंथात उल्लेखलेल्या अयोध्यावासी रामचंद्र तथा श्रीराम यांच्या जन्माची आठवण म्हणून रामनवमी यात्रा सुरू करण्यात आली होती. हिंदू न् मुस्लिम असा कोणताही धर्मभेद इथं या उत्सवा दरम्यान कधीच अनुभवायला मिळाला नाही. शोभायात्रा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे.          यंदा गोंधवणी भागातून शहरातील श्रीराम मंदिराच्या दिशेनं झेंडा मिरवणूक सुरू असताना याच मिरवणुकीत अयोध्यावासी श्रीरामांच्या त्या कालखंडा शी काही एक कालसाधर्म्य नसणारे मराठी मुलखातील आपल्या स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या सरदार अफजलखानाला चारी मुंड्या चित करीत असतानाचे कल्पनाचित्र काही उत्साही भक्तांकडून ह...

नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

इमेज
नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अनुमोदन मोहन जाधव व सचिन मस्के व सुनिल काळे यांनी केले. यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक पी.आय महेश पाटील, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष शालिनीताई संजय सुखदान, माजीनगरसेवक सचिन नागपुरे, सलीम भाई अल्ताफ पठाण ,बापूसाहेब कापरे, तसेच व्यापारी वर्गातील रामभाऊ घोलप, प्रवीण शहाणे, एकनाथ वाघ, संतोष परबळकर, बाळासाहेब सोनवणे, सोमनाथ गायकवाड, संजय मिटकरे, बबन वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच रिक्षा संघटनेचे अध्यक्ष भरत वालतुरे,सचिव योगेश काळे, उपाध्यक्ष गंगाराम नवसे यांच्यासह रिक्षाचालक सदस्य श्रीनिवास डहाळे आप्पासाहेब बंदिवान, किरण डाके, प्रमोद काळे, गंगाराम दगडे, संजय पोकळे, भाऊसाहेब डाके सचिन नागपुरे ,श्रीपतीराव दारुंटे, कैलास धारकर,  रमेश गायकवाड आप्पासाहेब बंदीवान,...

रामडोह येथील महिलां व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक महेश पाटिल यांना दिले आमरण उपोषणाचे निवेदन.

इमेज
रामडोह येथील महिलांनी व ग्रामस्थांनी दिले पोलीस निरीक्षक महेश पाटिल यांना आमरण उपोषणाचे निवेदन.  नेवासा, दिनांक २३ फेब्रुवारी२०२६. प्रतिनिधी:-हरिशदादा चक्रनारायण  नेवासा तालुक्यातील रामडोह येथील महिला व ग्रामस्थांनी आज रोजी नेवासा पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना लेखी निवेदन दिले की रामडोह येथील १)मनीषा शाम पर सैय्या उर्फ मनीषा सागर लकारे उर्फ मनीषा शंकर लकारे,२) मीरा शाम पर सैय्या व ३) गायत्री मनीषा लकारे या तिघी विनाकारण दुसऱ्यांच्या प्लॉटवर येऊन राहतात व खंडणी वसूल करण्यासाठी विनाकारण भांडण करतात व मोठ्या रकमेची मागणी करतात.पैसे नाही दिले तर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. गेल्या पाच सहा वर्षांमध्ये या तिघींनी मिळून रामडोह येथील दहा ते पंधरा लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून मोठ्या रकमेची मागणी केलेली आहे.तसेच शाळेत व कॉलेजमध्ये जाणाऱ्या अनेक तरुणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे रामडोह गावामध्ये एक भीतीचे वातावरण तयार झालेले असून पोलीस प्रशासनाने त्वरित या तीनही महिलांची सखोल चौकशी करून...

🚖 नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे चैन स्नॅचर महिला पकडली.

इमेज
🚖 नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे चैन स्नॅचर महिला पकडली वृद्ध महिलेचे गळ्यातील सोने गंठण सुरक्षित हस्तगत (नेवासा प्रतिनिधी:- हरिशदादा चक्रनारायण– तारीख:-१३/०२/२०२६) नेवासा शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या प्रकारात नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटना यांच्या पदाधिकारी व चालकांच्या सतर्कतेमुळे एका संशयित महिलेला पकडण्यात यश आले असून, वृद्ध महिलेचे गळ्यातील सोनेरी गंठण सुरक्षित परत मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनेरी गंठण अचानक गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तात्काळ रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व चालकांना याबाबत माहिती दिली व मदत मागितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी तत्परता दाखवत परिसरात संशयित महिलेचा शोध घेतला. संवाद साधून तिची चौकशी केली असता, संबंधित महिलेच्या पिशवीतून वृद्ध महिलेचे सोनेरी गंठण हस्तगत करण्यात आले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी संबंधित महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रिक्षा संघटनेच्या या सतर्क व धाडसी कृतीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आह...

नेवासा शहराध्यक्षपदी हरीशदादा चक्रनारायण; रिपब्लिकन सेनेत नव्या उर्जेची भर.

इमेज
नेवासा शहराध्यक्षपदी हरीशदादा चक्रनारायण; रिपब्लिकन सेनेत नव्या उर्जेची भर नेवासा, दि. १२ फेब्रुवारी २०२६ — नेवासा तालुक्यात फुले–शाहू–आंबेडकर चळवळीचे धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले हरीशदादा चक्रनारायण यांची रिपब्लिकन सेनेच्या नेवासा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे नेवासा शहर आणि तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी नेवासा येथे झालेल्या बैठकीत रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ साठे यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी नितीन शिवाजी जाधव यांची नेवासा तालुका संघटक म्हणून निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हरीशदादा चक्रनारायण यांनी २००५ पासून भारिप बहुजन महासंघातून समाजसेवेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले. शिर्डी लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना नेवासा तालुक्यातून १३ हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यात त्यांच्या नियोजनाची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते.२०२४ पर्यंत त्यांनी वंचितस...