नेवासा शहराध्यक्षपदी हरीशदादा चक्रनारायण; रिपब्लिकन सेनेत नव्या उर्जेची भर.
नेवासा शहराध्यक्षपदी हरीशदादा चक्रनारायण; रिपब्लिकन सेनेत नव्या उर्जेची भर
नेवासा, दि. १२ फेब्रुवारी २०२६ — नेवासा तालुक्यात फुले–शाहू–आंबेडकर चळवळीचे धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले हरीशदादा चक्रनारायण यांची रिपब्लिकन सेनेच्या नेवासा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे नेवासा शहर आणि तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी नेवासा येथे झालेल्या बैठकीत रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ साठे यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यावेळी नितीन शिवाजी जाधव यांची नेवासा तालुका संघटक म्हणून निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
हरीशदादा चक्रनारायण यांनी २००५ पासून भारिप बहुजन महासंघातून समाजसेवेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले. शिर्डी लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना नेवासा तालुक्यातून १३ हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यात त्यांच्या नियोजनाची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते.२०२४ पर्यंत त्यांनी वंचितसोबत काम केले.अनेक वर्ष पक्षाबरोबर प्रामाणिकपणे राहुनही आमदारकीची उमेदवारी नाकारल्यानंतर लोकाग्रहास्तव त्यांनी बसपाकडून निवडणूक लढवली.विशेष म्हणजे त्यांना मिळालेली मते वंचितच्या उमेदवारापेक्षा अधिक होती.
जर वंचितकडुन उमेदवारी मिळाली असती तर तालुक्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले असते अशी त्यावेळी लोक चर्चा करत होते.
त्यांनी चौथ्या क्रमांकाची मते मिळवली होती.
२००५ पासून सतत लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्या घरासमोरच‘जनता दरबार’ भरतो, अशी तालुक्यात चर्चा आहे. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन किंवा इतर शासकीय कामे असोत, भांडण–तंटे असोत; अनेक नागरिक विश्वासाने त्यांच्याकडे धाव घेतात. लोकांच्या सेवेसाठी ते २४ तास उपलब्ध असतात, असे कार्यकर्ते सांगतात.
नियुक्तीनंतर हरीशदादा चक्रनारायण यांनी सांगितले की,“नेवासा शहरात प्रभाग तिथे आणि तालुक्यात गाव तिथे शाखा उघडून सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी जीवाचे रान करू. नेवासा तालुक्याच्या विकासासाठी चळवळ आणि आंदोलनाच्या माध्यमातून कायम कार्यरत राहू.”
निवडीनंतर सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देत पुढील कामासाठी मार्गदर्शन केले.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी तालुका उपाध्यक्ष संतोष साठे, तालुका कार्याध्यक्ष विनोद पटेकर, तालुका सचिव गणेश पारखे, अशपाकभाई शेख, पत्रकार सुमित पठारे तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ साठे यांनी सांगितले की, निवडीनंतर स्वतः कार्यकर्त्यांना फोन करून शुभेच्छा देणारे आनंदराज आंबेडकर हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा