नेवासा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पहिल्या शाखेचे प्रवरासंगम येथे प्रदेशाध्यक्ष सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन.
प्रवरा संगम येथे रिपब्लिकन सेना शाखेचे उद्घाटन; बहुजन समाज पक्षाच्या माजी तालुकाध्यक्षांचा रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश....!
प्रवरा संगम (ता. नेवासा), दि. 26 जून 2026 : नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे रिपब्लिकन सेनेच्या तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन सेनेच्या शाखेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील कुमार सूर्यवंशी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड तसेच अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे मा.नेवासा तालुकाध्यक्ष हरिषदादा चक्रनारायण यांनी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी व पक्ष संघटनेने कार्यकर्त्यांच्या पाठीशी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे.
प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील कुमार सूर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचा ठाम विरोध असल्याचे स्पष्ट केले. उपवर्गीकरणामुळे होणारे तोटे सविस्तरपणे मांडताना त्यांनी सांगितले की, सेनानी आनंदराज आंबेडकर हे कोणत्याही जातीच्या विरोधात नसून मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात संघर्ष करत आहेत. अनुसूचित जातीतील ५९ जातींचे विभाजन होऊ देणार नाही, त्यांना एकसंघ ठेवणे हीच पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
औरंगाबाद जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड यांनी तरुणांनी मोठ्या संख्येने पक्षात सहभागी होऊन महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रसार करावा, असे आवाहन केले.तसेच बेरोजगार तरुणांसाठी लाखो रुपयांच्या कर्ज योजनांचा पाठपुरावा करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील,असे आश्वासन दिले.
अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अहमदनगर उत्तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यात येईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाची पूर्ण ताकद दिली जाईल.
या कार्यक्रमात प्रवरा संगम शाखेचे उद्घाटन करून रवींद्र पारखे यांची शाखाध्यक्षपदी तर बाळासाहेब पवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील कुमार सूर्यवंशी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन, उत्तर जिल्हा प्रवक्ते शिवा साठे, ठोकळ साहेब, गंगापूर तालुकाध्यक्ष अमोल कानडे,उत्तर युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ साठे, नेवासा तालुकाध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण, संतोष साठे, गणेश पारखे, मच्छिंद्र पारखे, कासूदे साहेब, नितीन भालेराव, संतोष मोरे, पोपटराव चाबुकस्वार यांच्यासह अनेक पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष साठे यांनी केले. शेवटी शाखाध्यक्ष रवींद्र पारखे यांनी उपस्थित मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचा समारोप रिपब्लिकन सेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा समाजात अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करुण करण्यात आला.
बातमीदार: हरिशदादा चक्रनारायण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा