रामडोह येथील महिलां व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक महेश पाटिल यांना दिले आमरण उपोषणाचे निवेदन.


रामडोह येथील महिलांनी व ग्रामस्थांनी दिले पोलीस निरीक्षक महेश पाटिल यांना आमरण उपोषणाचे निवेदन. 

नेवासा, दिनांक २३ फेब्रुवारी२०२६.
प्रतिनिधी:-हरिशदादा चक्रनारायण 
नेवासा तालुक्यातील रामडोह येथील महिला व ग्रामस्थांनी आज रोजी नेवासा पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना लेखी निवेदन दिले की रामडोह येथील १)मनीषा शाम पर सैय्या उर्फ मनीषा सागर लकारे उर्फ मनीषा शंकर लकारे,२) मीरा शाम पर सैय्या व ३) गायत्री मनीषा लकारे या तिघी विनाकारण दुसऱ्यांच्या प्लॉटवर येऊन राहतात व खंडणी वसूल करण्यासाठी विनाकारण भांडण करतात व मोठ्या रकमेची मागणी करतात.पैसे नाही दिले तर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात.

गेल्या पाच सहा वर्षांमध्ये या तिघींनी मिळून रामडोह येथील दहा ते पंधरा लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून मोठ्या रकमेची मागणी केलेली आहे.तसेच शाळेत व कॉलेजमध्ये जाणाऱ्या अनेक तरुणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत.
त्यामुळे रामडोह गावामध्ये एक भीतीचे वातावरण तयार झालेले असून पोलीस प्रशासनाने त्वरित या तीनही महिलांची सखोल चौकशी करून ज्या ज्या लोकांवर यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते त्वरित चौकशीअंती मागे घेण्यात यावेत व या तिघींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की पिडितांना योग्य न्याय नाही मिळाला तर कार्यालयासमोरच आमरण उपोषण करण्यात येईल.
एकच महिला गावातील अनेक महिलां संगती भांडण करून त्यांच्या घरातील पुरुष मंडळीवर खोटे गुन्हे दाखल करत आहे आणि पोलीस प्रशासनही या महिलेचे ऐकूण कोणतीही सखोल चौकशी व‌ शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल करतातच कसे असा प्रश्न रामडोह मधील सर्व ग्रामस्थांना पडलेला आहे.
यावेळी गावातील अनेक पुरुषांनी त्यांच्यावरती कसे खोटे गुन्हे दाखल केले आहेत याविषयी मिडीया समोर सविस्तर माहिती दिली व रिपब्लिकन सेनेचे नेवासा शहराध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांची भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविषयी सांगून सविस्तर माहिती दिली. 
यावेळी रिपब्लिकन सेनेचे नेवासा शहर अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांनी मीडियासमोर प्रशासनाला सांगितले की कायद्याचा कोणालाही गैरवापर करता येणार नाही तसेच ज्या ज्या शालेय विद्यार्थ्यांवर व कॉलेज विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे त्याची सखोल चौकशी होऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व सरपंच यांनी गावामध्ये कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी म्हणून गावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही म्हटले आहे.व पिडितांबरोबर आपण खंबीरपणे उभे आहोत याचा पाठपुरवठा करून पिडितांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू तसेच प्रशासन जर कर्तव्यात कसूर करत असेल तर त्या विरोधात लवकरच मोठे जनआंदोलन करू असा इशाराही हरीशदादा चक्रनारायण यांनी दिला आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनावर एकूण 25 पेक्षा जास्त महिलांनी सह्या केलेल्या आहेत. यामध्ये नंदिनी राहुल गंगुले कोमल घुंगासे, अलका अहिरे, संगीता गंगुले,छाया गंगुले,इंदुबाई गहिरे, सुमनबाई गहिरे, मिनाबाई कुंढारे,
मंगलबाई पल्हारे,शोभा पल्हारे, रुक्मिणी कुंढारे,रामकौराबाई गहिरे, सुनिता घुंगासे,राणी गहिरे,रूपाली, नंदा परसैय्या,पारूबाई गव्हाणे, रशीदा पठाण, नीलोफर सलीम पठाण, मीरा रमेश परसैय्या, जयश्री शांतीलाल परसैय्या, सरस्वती तुकाराम परसैय्या, अनिता भगवान गहिरे, मीना नवनाथ गहिरे, नीता संतोष गहिरे,व 50 पेक्षा जास्त गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या या महिलेवर योग्य कारवाई न केल्यास रामडोह येथील महिलांनी व ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन समोरच आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी सौ सुनीता संजय घुंगासे व नीता संतोष गहिरे यांनी स्वतंत्रपणे मनीषा सागर लकारे हिच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बी.एन. एस. 2023 अन्वये अनुक्रमे एन. सी. आर.क्र.२६६/२०२६ ३५१(२)३५२,व
एन.सी.आर. क्र.२६७/२०२६,
३५१(२)३५२ गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नेवासा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पहिल्या शाखेचे प्रवरासंगम येथे प्रदेशाध्यक्ष सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन.

नेवासा शहराध्यक्षपदी हरीशदादा चक्रनारायण; रिपब्लिकन सेनेत नव्या उर्जेची भर.

🚖 नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे चैन स्नॅचर महिला पकडली.