उ.बा.ठा. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.निरज नांगरे यांचा समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश.
नेवासा बातमी : उबाठा गट युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. निरज नांगरे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला.
भेट घेण्यासाठी गेलो असता स्वतः पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वतः आमचे स्वागत केले. त्यामुळे जिथे मान सन्मान आणि कामे होतात तोच खरा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिंदे गटाच्या शिवसेनेत आल्याचे आम्हाला खरे समाधान झाले असल्याची भावना व्यक्त करून नेवासे तालुक्यात भगवे वादळ उभे करू असा निर्धार शिवसेनेचे युवानेते विधिज्ञ नीरज नांगरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
उबाठा गट युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.निरज नांगरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला.शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी शिवसेनेच्या शाखा स्थापन करून युवा शक्तीला संघटित करून शिंदे साहेबांच्या मागे युवा शक्तीचे पाठबळ उभे करू असा निर्धार निरज नांगरे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी समोर बोलताना व्यक्त केला.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी ॲड. अभिजित काळे, प्रकाश शेजुळ, भरत नांगरे, पप्पू शेजुळ उपस्थित होते. ॲड.निरज नांगरे यांनी बोलताना सांगितले की,आम्ही हिंदूहदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेत आलो, युवकांच्या संघटनासाठी मला युवा सेनेची जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र ही जबाबदारी पार पाडताना वरिष्ठ पातळीवर म्हणावे तसे पाठबळ आम्हाला मिळाले नाही, मुंबईत आमचे म्हणणे मांडण्यासाठी गेलो असता आम्हाला उद्धव ठाकरे यांना भेटू दिले नाही आणि नेहमीच निष्ठावान शिवसैनिकांना टाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
उबाठा शिवसेनेच्या माध्यमातून मी युवा सेनेचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून गेली बारा वर्षे काम केले युवकांचे संघटन केले. मात्र आम्हाला कधी ही निर्णय घेताना विचारले नाही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
आम्ही सर्व युवकांना घेऊन शिंदे साहेबांकडे गेलो आमच्यावर झालेला अन्याय सांगितला तेव्हा त्यांनी आम्हाला पाठबळ देऊन मनोधैर्य उंचविण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे आम्ही युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आमच्या पाठीवर थाप देत त्यांनी तालुक्यात युवा संघटन उभे करा, नेवासा तालुक्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. तुम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील अशी ग्वाही दिल्याने आता आम्ही शिवसेना बळकट करण्यासाठी रात्रंदिवस काम करू, तळागाळात शिवसेनेची ताकद वाढवू अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली.
ॲड.निरज नांगरे यांच्या शिंदे गट पक्ष प्रवेशामुळे नेवासा तालुक्यात महायुतीची ताकद वाढली असून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिंदे गट शिवसेना प्रवेशानंतर युवा सेनेचे पदाधिकारी ही शिवसेनेत दाखल झाल्याने नेवासा तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली असून त्यामुळे शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना देखील मोठे पाठबळ येथून पुढे मिळेल अशी तालुक्यातील लोकं बोलत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा