केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

मुकिंदपुर तालुका नेवासा येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार नेवासा व पोलीस निरीक्षक नेवासा यांना निवेदन.
दि. १२/१०/२०२३.(प्रतिनिधी नेवासा)
मुकुंदपुर तालुका नेवासा येथील पत्रकार सुरेंद्र सिंग कैलास परदेशी उर्फ बादल यांच्यावर दिनांक 9/ 10 /2023 रोजी भ्याड हल्ला झाला होता. त्यासंदर्भात दिनांक 9 10 2023 रोजी पत्रकार बादल यांनी नेवासा पोलीस स्टेशनला जाऊन रिसेल फिर्याद नोंदवली आहे.
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा पोलीस निरीक्षक व नेवासा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर झालेल्या घटनेचा केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव हरीश चक्रनारायण, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तांबे,(सर) यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे व पत्रकार सुरेंद्र सिंग परदेशी उर्फ बादल यांना कायदेशीर रीतीने न्याय मिळवून द्यावा म्हणून निवेदनात मागणी केलेली आहे,
 निवेदनावर केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तांबे सर, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष परवेज पठाण, केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हा संघटक किरण कणगरे, नेवासा तालुका कार्याध्यक्ष गणेश जगरे, कार्याध्यक्ष बाबासाहेब गव्हाणे व महाराष्ट्र राज्याचे सचिव हरीशदादा चक्रनारायण यांच्या सह्या आहेत.
माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी प्रत:-
जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर,
जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब अहमदनगर. यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....