सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....

सकल ख्रिस्ती समाजाच्या व पास्टर फिलोशिपच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्थगित.
सविस्तर वृत्त:- दिनांक- २६/०२/२०२४ रोजी तहसील कार्यालय नेवासा येथे सकल ख्रिस्ती समाजाच्या व फुले शाहू आंबेडकर संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्याचे ठरले होते व तसे निवेदन तहसील कार्यालय व नेवासा पोलीस स्टेशनला  देण्यात आले होते.
विषय :- ख्रिस्ती धर्मगुरुवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेवून ख्रिस्ती धर्माची व समाजाची              
                बदनामी करणाऱ्यावर कायदेशिर कार्यवाही व्हावी म्हणून सकल ख्रिस्ती समाजाच्या व 
                फुले शाहू  आंबेडकर संघटनेच्या वतीने दि. २६/०२/२०२४ रोजी तहसिल कार्यालयावर  
                निषेध मोर्चा काढण्यात येणार होता तो मोर्चा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित          
                करण्यात आला आहे.

अर्जदार :-   पा. हरिषदादा चक्रनारायण 
                एबेन-एजेर पास्टर फेलोशीप संस्थापक अध्यक्ष महाराष्ट राज्य, 
                केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सचिव, 
                वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष मो. क्र. 8856964252  
मा. मोहदय,
               दि. १५/०२/२०२४ रोजी चर्चच्या आवारात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली झालेल्या घटनेचा नेवासा तालुक्यातील सकल ख्रिस्ती समाजाच्या व  पास्टर फेलोशीपच्या वतीने आम्ही जाहीर निषेद केलेला आहे. व सदर गुन्ह्यातील खरा एक आरोपी यास कठोरातील कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे. 
               सदर गुन्ह्यामध्ये पास्टर सुनिल गुलाब गंगावणे रा. बिशप लॉईड कॉलनी, अहमदनगर व पास्टर संजय केरू वैरागर रा. सोनई या दोन धर्मगुरूचा सदर घटनेशी काहीही संबंध नसताना त्यांचेवर खोटे गुन्हे दाखल करून धर्मगुरूंची व सकल ख्रिस्ती समाजाची बदनामी करण्यात आली व त्यामुळे ख्रिस्ती समाजाचे अपरिमित असे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्याच्या निषेधार्थ दि. २६/०२/२०२४ रोजी नेवासा तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार होता तो मोर्चा नेवासा शहरातील मोहिनीराज मंदिराची सालाबाद प्रामाणे यात्रा असल्यामुळे सर्व धर्मीय लोकांचे संबंध असल्यामुळे यात्रेवर शांतता भंग होवू नये तसेच नेवासा तालुक्यातील लोक हे सर्व जाती धर्माचा आदर करणारे लोक आहेत व एकमेकांच्या सुख- दुखामध्ये सहभागी होणारी लोक आहेत म्हणून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होवू नये तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवू नये म्हणून सदर मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. अशी लेखी निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
यावेळी अनेक मान्यवर व धर्मगुरू उपस्थित होते.            पा.हरिषदादा चक्रनारायण,(एबेन-एजेर पास्टर फेलोशीप संस्थापक अध्यक्ष महाराष्ट राज्य व वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष,)
पास्टर प्रकाश चक्रनारायण,(नेवासा फास्टर फेलोशिप अध्यक्ष, )
ब्रदर शिरीष लोंढे,विल्यम गायकवाड( विराट सामाजिक प्रतिष्ठान नेवासा शहराध्यक्ष.) पास्टर यहोशवा मोहिते, सिस्टर मोहिते, पास्टर जाधव पुणे, असे व इतर सामाजिक कार्यकर्ते व देवाचे सेवक उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-
प्रतिनिधी:-हरीशदादा चक्रनारायण,
केंद्रीय लोकशाही न्यूज, (CDJA),
8856964252.

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!