अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!


ठळक घडामोडी:-
👉अंबरनाथ तालुक्याच्या तहसीलदार व महसूल प्रशासनाचा भ्रष्ट कारभार..!

👉कर्तव्यदक्ष पदाचा गैरवापर करून अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती तर महसूल प्रशासन झाले लखपती.!

👉ढवळे- वांगणीy, तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील मशिदीच्या जमिनीची लोक-आयुक्तांकडून चौकशी सुरू!*

👉अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने व महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले.

केंद्रीय लोकशाही पत्रकार न्यूज:-
बातमीदार:-हरीशदादा चक्रनारायण.
(केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ,)
 महाराष्ट्र राज्य सचिव.8856964252

अंबरनाथ तालुक्याच्या तहसीलदार सौ. प्रशांती विनायक माने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मश्चिदीचा भूखंड कुळ कायदा वहीवाट लावून कांबरी कुटुंबियांच्या घशात घातला व कोट्यावधी रुपयांची माया जमवली असा आरोप ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर व मुस्लिम बांधवांनी लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या तक्रारी निवेदनात केला आहे.

👉सविस्तर वृत्त असे की दिनांक ११ /१२/२०२३ रोजी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर व मुस्लिम बांधवांनी लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना मौजे ढवळे-वांगणी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील सर्वे नंबर २९/५ मधील मशिदीचा माळरान पडीक भूखंड तहसीलदार सौ. प्रशांती विनायक माने व महसूल पदाधिकारी, सर्कल व तलाठी यांनी संगणमत करून कोट्यावधी रुपये घेऊन भ्रष्टाचार केला व आपल्या पदाचा गैरवापर करून मशिदीचा भूखंड कुळ लावून बेकायदेशीर कृती केल्याचा आरोप करीत लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदन दिले आहे.*

 👉मौजे ढवळे- वांगणी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे मशिदीचा ७/१२ उतारा ५९/१/२/३ व मशिदीचा पंच म्हणून इसुब इब्राहिम गाजी म्हणून नोंद असून कुळाचे नावे नाहीत.फक्त २९/५ सर्वे नंबर लाच कुळ  कसे लागले.यामध्ये मशिदीच्या भूखंडाची सखोल चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम बांधवांनी निवेदनात केली आहे.*

👉तसेच माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीमध्ये दिनांक ०७/ १०/ २०११ च्या पत्रात मंडलाधिकारी गोरेगाव-वांगणी मौजे ढवळे सर्वे नंबर २९/५ या जमिनीचे कब्जेदार हाजीमीया अरहमान असल्याची फेर क्र. ५७४ मध्ये नोंद असताना कुळ कमी करून मश्चिद असा उल्लेख आहे. परंतु महसूल प्रशासनाने भ्रष्ट प्रवृत्तीने व लालसे-पोटी..*
१)मंजुळाबाई नामा कांबरी,
२)अनंत नामा कांबरी,
३)विमल नामा कांबरी,
४)सुलभा नामा कांबरी.
अशी एक ते चार कुळांची नावे टाकली आहेत.

 👉दि.०२/०२/१९७१ मध्ये मंडळ-अधिकारी यांनी त्यांच्या कुलमुखत्यांनी म्हणून बाळाराम जगन कांबरी. राहणार-कासगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे यांनी तहसीलदार प्रशांती माने यांना अर्ज करून दावा चालवून मशिदीचा भूखंड पदरात पाडून घेतला असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

वांगणी रेल्वे स्टेशन लगत ०७ मिनिटांच्या अंतरावर मौजे ढवळे सर्वे नंबर २९/५ ही जमीन असून जमिनीला सोन्याचा भाव आल्याने जमीन विकण्याचा घाट २०१५ मध्येच चोफर परिवाराने घातला होता परंतु मुस्लिम बांधवांनी तो उधळून लावला होता. तसे वृत्तपत्रांमध्येही छापून आले होते असेही लोक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच संपूर्ण अंबरनाथ तालुका भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडला आहे व यात पहिल्या क्रमांकावर महसूल विभाग आहे आणि या भ्रष्ट महसूल विभागाला तमाम शेतकरी बांधव, आदिवासी बांधव, वंचित-पीडित-गोरगरीब जणता त्रस्त झाली आहे.

👉त्यांच्या जमिनी भु-माफीयांच्या घशात घालण्याचा उपक्रम अंबरनाथच्या महिला तहसीलदार प्रशांती विनायक माने या राबवत असून त्यात त्यांनी महसूल विभागाला हाताशी धरून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
 मौजे ढवळे-वांगणी मशिदीच्या जमिनीचा झालेला भूखंडाचा घोटाळा हे ताजे उदाहरण आहे असे म्हटले आहे.चर्च, मंदिर, मशिदीच्या जमिनीवर कुळ लागत नाही व त्याची खरेदी-विक्री होत नाही असा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आहे.मशिदीच्या जमिनीवर कुळ लावण्यात आले जे बेकायदेशीर आहे.

 जिल्हाधिकारी ठाणे येथे अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक संग्राम सिंह निशाणदार यांनी दिलेल्या पत्रानुसार जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर, सर्कल गोरेगाव व तलाठी वांगणी यांची सुनावणी सुरू होती.मात्र कोरोना काळात अप्पर जिल्हाधिकारी यांचा मृत्यू झाला व कोरोनामुळे सुनावणी स्थगित झाली व सुनावणीचा निर्णय लागला नाही. याचा गैरफायदा तहसीलदार प्रशांती माने यांनी घेऊन दिलेल्या तक्रारी अर्जावर आपल्या पदाचा गैरवापर करून मयत हाजीमिया  अरहमान व कांबरी यांची कुळ वहीवाट दावा चालून बेकायदेशीर निर्णय कांबरी यांच्या बाजूने देऊन तहसीलदार माने या करोडपती झाल्या व महसूल प्रशासन लखपती झाले असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
 तसेच या धार्मिक मशिदीच्या भूखंडाची तात्काळ चौकशी करून तहसीलदार प्रशांती माने, महसूल अधिकारी प्रशांत जोशी, मंडलाधिकारी अण्णा, तलाठी तात्या यांची खातेनिहाय चौकशी करून तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करून तात्काळ या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनात ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर व तमाम मुस्लिम बांधवांनी केली आहे.
आता लोकआयुक्त काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय लोकशाही पत्रकार,
न्यूज:- हरीशदादा चक्रनारायण,
महाराष्ट्र राज्य सचिव.
बातम्यांसाठी संपर्क करा. 8856964252

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....