ईव्हीएम जनजागृती अभियान राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांनी घेतली समक्ष भेट.

वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव हरीशदादा चक्रनारायण यांनी घेतली ईव्हीएम जनजागृती अभियान राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भेट.
आज दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी नेवासा तहसील कार्यालय येथे आयोजित ईव्हीएम जनजागृती केंद्र येथील पदाधिकारी यांची थोडक्यात मुलाखत घेऊन ईव्हीएम मशीन संदर्भात काही प्रश्न विचारून पदाधिकाऱ्यांकडून घेतली माहिती.
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:-हरीशदादा चक्रनारायण
16 डिसेंबर 2023 पासून नेवासा तहसील कार्यालयामध्ये ईव्हीएम जनजागृती केंद्र सुरू आहे त्यांचे दोन पथक आहेत एक पथक नेवासा तालुक्यातील खेड्यांमध्ये जाऊन ईव्हीएम जनजागृती मोहीम राबवत आहेत तर दुसरे पथक नेवासा तहसील कार्यालयामध्ये ईव्हीएम जनजागृती केंद्र च्या माध्यमातून तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांना ईव्हीएम कसे शंभर टक्के विश्वास ठेवण्या योग्य आहे हे पटवून सांगत आहेत, जेव्हा ही गोष्ट वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी स्वतः जाऊन ईव्हीएम मशीन मध्ये मतदान कशा पद्धतीने होते ते तपासून पाहिले. आपण ज्या मतदाराला मतदान करतो ते बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट वर त्याचे चिन्ह व उमेदवाराचे नाव आपल्याला दिसते त्यानंतर वरील चिट्टी खाली पडते व आपले मतदान झाले असे सिद्ध होते. 
यावर पदाधिकाऱ्यांना विचारना करण्यात आली की उमेदवाराला मतदान करतो ते व्हीव्हीपॅट मध्ये दिसते मात्र व्हीव्हीपॅट वरील ज्या चिठ्ठ्या आत मध्ये मशीन मध्ये पडतात  त्या सर्व काउंट केल्या जातात का ? किंवा त्या सर्व चिठ्ठ्या मतदानाच्या दिवशी मोजल्या जातात का? 
त्यावर संबंधित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की नाही सर्व चिठ्ठ्या मोजल्या जात नाहीत तर फक्त पाच टक्के व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जातात व बाकी ईव्हीएम मशीन मध्ये काउंट केलेले मतदानाच्या आधारे उमेदवाराचं मतदान घोषित केले जाते. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष यांनी त्यांना अशी विचारणा केली की जर ईव्हीएम मशीन पूर्णपणे विश्वास ठेवण्याजोगे आहे तर व्हीव्हीपॅट वरील चिठ्ठ्या ज्या आत मध्ये पडतात त्या शंभर टक्के निवडणूक आयोग का मोजत नाहीत?

त्यावर संबंधित पदाधिकारी यांनी म्हटले की हा आमचा विषय नाही! हा निवडणूक आयोगाचा, वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे!
त्यावर वंचितचे तालुकाध्यक्ष यांनी या पदाधिकाऱ्यांना असे सांगितले की जर तुम्हाला जनतेमध्ये ईव्हीएम मशीन संदर्भात विश्वासहार्यता निर्माण करायची असेल तर आपल्या माध्यमातून मी सत्ताधार्यांना, विरोधी पक्ष नेत्यांना व निवडणूक आयोगाला हे सांगू इच्छितो की व्हीव्हीपॅट मधील ज्या चिठ्ठ्या मशीन मध्ये खाली पडतात त्या सर्वच्या सर्व म्हणजे त्या मशीन मध्ये जितके मतदान झाले आहे तितक्या व्हीव्हीपॅट चिठ्या मोजनी  होऊनच उमेदवाराचे मतदान घोषित केल्यास जनतेमध्ये ईव्हीएम मशीन संदर्भात विश्वास वाढेल.
अन्यथा ईव्हीएम मशीन कायम संशयाच्या भवऱ्यात आहे व राहील.सर्वसामान्य जनतेचा व सुशिक्षित मतदारांचा आज देखील ईव्हीएम मशीन वरती भरवसा, विश्वास, खात्री नाही.
          जर तुम्हाला बॅलेट पेपर वरती मतदान घ्यायचे नसेल तर ईव्हीएम मशीन मधील व्ही व्ही पॅट वरील चिठ्ठ्या शंभर टक्के मोजून जनतेला त्याचा संपूर्ण निकाल देण्यात यावा व तशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी व सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाला करावयास काय हरकत आहे?
जर विरोधक व सत्ताधारी तसे करत नसतील तर 100% दाल में कुछ काला है!कुछ तो गडबड है दया!हा संदेश जनतेपुढे जातो व ईव्हीएम संदर्भात अविश्वास तयार होतो.यावर ईव्हीएम जनजागृती केंद्र चालवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हे आमच्या हातामध्ये नाही परंतु आपण आपला अभिप्राय आमच्या नोंदवहीमध्ये नोंदवा म्हणजे आम्ही ते वरिष्ठांना दाखवू.
     यावर वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांनी त्यांच्या नोंदवही मध्ये आपला अभिप्राय नोंदवून निवडणुका या बॅलेट पेपर वरतीच झाल्या पाहिजे असे नमूद केले. आणि जर बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्यायच्या नसतील तर शंभर टक्के व्हीव्हीपॅट वरील चिठ्ठ्या मोजल्या जाव्यात व नंतरच निकाल जाहीर करण्यात यावा असे आपले मत व्यक्त केले.
तहसील कार्यालयामध्ये उपस्थित अनेक मतदारांनीही आपापले अभिप्राय नोंदवले व बॅलेट पेपर वरतीच मतदान झाले पाहिजे असे अनेकांनी सांगितले.
सध्या संपूर्ण भारत देशामध्ये ईव्हीएम हटाव अशी जनजागृती चालू आहे,सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी देखील यावर आंदोलन करून आपला आवाज उठविला आहे.

केंद्रीय लोकशाही CDJA न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:-
मा.हरीशदादा चक्रनारायण.
बातम्या व जाहिरातीसाठी.... संपर्क:-8856964252

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....