आदिवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित तंट्या ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांचे नेवासा तहसील कार्यालयावर उपोषण.

आदिवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित तंट्या ब्रिगेड आदिवासी संघटनेचे नेवासा तहसील कार्यालयावर आमरण उपोषण.
प्रतिनिधी:- हरीशदादा चक्रनारायण.
नेवासा- दिनांक 9.1.2024 रोजी नेवासा तहसील कार्यालयावर आदिवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित तंट्या ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या आदिवासी संघटनेने ज्ञानेश्वर भंगड यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे काल दिवसभर तहसील कार्यालयातून एकही पदाधिकारी उपोषणकर्त्यांकडे फिरकला देखील नाही.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी रात्री साडेआठ वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष हरीश दादा चक्रनारायण यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तहसीलदार संजय बिरादार यांच्याशी फोनवरती संपर्क साधून उपोषणकर्त्यांची माहिती दिली काल सायंकाळी पाच वाजल्यापासून नेवासा शहरामध्ये पाऊस सुरू झाला होता भर पावसामध्ये उपोषण करते पावसामध्ये भिजले होते त्यांच्या अंगावरही काही नव्हते याची सविस्तर माहिती हरीशदादा चक्रनारायण यांनी तहसीलदारांना दिली त्यावर तहसीलदार साहेबांनी सांगितले की संबंधित उपोषणकर्त्यांच्या मागण्या या आमच्या कार्यालयाशी निगडित नाहीत तरी सकाळी लवकर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यावर तोडगा काढण्यात येईल त्यावर हरीश दादा चक्रनारायण यांनी तहसीलदारांना विनंती केली की पावसामुळे उपोषण करताना त्रास होत आहे त्यांना बसण्यासाठी ही जागा नाही ते सर्व पावसामध्ये भिजले आहेत त्यांच्या अंगावरही काही नाही तरी त्यांची झोपण्याची व्यवस्था तहसील कार्यालयाची जुनी इमारत मधील मोकळा हॉल मध्ये करण्यात यावी त्यावर तहसीलदार यांनी माणुसकी दाखवत रात्री जुनी इमारत मधील हॉल उपोषणकर्त्यासाठी दिला त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीने तहसीलदारांचे आभार मानले आहेत.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:-
१) भिल्ल क्रांतिवीर भागोजी नाईक नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील भागोजी नाईकांचे विजय स्मारक अजित पवार गटाचे आमदार माणिक कोकाटे यांनी भिल्ल समाजाला विश्वासात न घेता बेकायदेशीर पणे उध्वस्त केले त्यामुळे आमदार माणिक कोकाटे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायदा खाली गुन्हा दाखल करण्यात यावा.
२) एकात्मिक आदिवासी प्रकल्प राजूर मार्फत देण्यात येणाऱ्या अनुदान योजना अकोला सोडून इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या असताना आदिवासी प्रकल्पाच्या योजनांचा लाभ मिळत नाही.
३) नेवासा खुर्द गोरक्षण संस्था नेवासा खुर्द येथील गायरान जमीन ३५/१ व ३५/२ मधील पीक पाहणी केस नंबर तीन अहवाल मिळणे बाबत.
४) नेवासा खुर्द नागझिरी जवळ असलेल्या वन जमीन गट पिकांची पाहणी स्थळ निरीक्षण पंचनामा जबाब होण्याबाबत.
५) लॉकडाऊन मधील कट झालेले आदिवासी समाजाचे मीटर त्वरित जोडण्यात यावेत.
६) शेतीसाठी डीपी मिळण्याबाबत.
७)नवीन रेशन कार्ड वर त्वरित धान्य सुरू करण्याबाबत ८)सरकारी अनुदान मिळण्याबाबत.
आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी आपल्या निवेदनात केले आहेत.
उपोषण कर्ते:-बाळासाहेब राजाराम बर्डे,रंजीत विश्वनाथ माळी, परसराम विश्वनाथ माळी, सोमनाथ विश्वनाथ माळी,सर्जेराव विश्वनाथ माळी, सिताराम विश्वनाथ माळी, रामदास सिताराम बर्डे, सुभाष लहान बर्डे, सुरेश हरिभाऊ मानगुडे,विलास विश्वनाथ मोरे,सखाराम बंसी पवार ,अनिल विश्वनाथ गायकवाड, अण्णा गंगाराम गोलवड, गंगाराम विश्वनाथ माळी, बाळासाहेब विश्वनाथ माळी, संजय विश्वनाथ माळी, अशोक लहान उंबर्डे ,ज्ञानेश्वर बंडू पवार, अशोक जाधव आधी उपोषण करते आपल्या कुटुंबासह उपोषणास बसले आहेत.

 आदिवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित तंट्या ब्रिगेड महाराष्ट्र राज्य पदाधिकारी. ज्ञानेश्वर भंगड अध्यक्ष विठ्ठल माळी प्रदेशाध्यक्ष श्याम मोरे उपप्रदेश अध्यक्ष सुनील मोरे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बर्डे जिल्हाध्यक्ष कुमार माळी जिल्हाध्यक्ष रामू मोरे अनिल पवार शिवनाथ जाधव रामदास भेळे बबन माळी बाबा इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य संघटक शरदराव खरात यांचे या उपोषणाकडे बारकाईने लक्ष असून त्यांनी वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांना उपोषण करत्यांना सहकार्य करण्यास सांगितले असून  उपोषणकर्त्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत पाठपुरवठा करण्यास सांगितले आहे. वंचित बहुजन आघाडीने या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....