केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने कृष्णा दळे यांचा सत्कार, बोगद्यात अडकलेल्या अकरा कामगारांना बाहेर काढण्यात मोलाचं योगदान.

कृष्णा दळे यांचा सत्कार, बोगद्यात अडकलेल्या अकरा कामगारांना बाहेर काढण्यात मोलाचं वाटा. 
प्रतिनिधी:-हरीशदादा चक्रनारायण,
(केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सचिव.)
महाराष्ट्र मधील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वाहेगावचा कृष्णा दळे उत्तरेत मदतीला धावला.
रेस्क्यू ऑपरेशन मध्ये 3 दिवस बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी जगभरातील तज्ञ तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत होती,रेस्क्यू ऑपरेशन मध्ये पुण्यातील एका कंपनीत सीनिअर,अप्लीकेशन इंजिनीअर असलेला पैठण तालुक्यातील वाहेगावचा कृष्णा दळे हा पाच जणांच्या टीम सोबत 3 दिवस बोधग्यात काम करीत होता.
कामगारांना बाहेर काढण्यासाठी केंद्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत होते,त्यासाठी जगभरातून तज्ञांना आमंत्रित केले होते त्यात पुण्यातील सुरेश इंदू लेझर कंपनीच्या टीमलाही पाचारण करण्यात आले त्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वर्धमान शाह, टेक्निकल संचालक प्रफुल्ल्य जोशी, सीनियर अप्लीकेशन इंजिनीअर कृष्णा दळे, सीनिअर डिझायर मॅनेजर संदीप कुमार,सीनियर प्रोडक्शन इंजीनियर मयूर वडमारे यांचा समावेश होता.
लेझरकटिंग मशीन ने ब्लेड कट करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली ही संपूर्ण टीम तीन दिवस बोगद्यातच मुक्कामाला होती अशी माहिती अभियंता कृष्णा दळे यांनी सार्वमतशी व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाशी बोलताना सांगितले.
कृष्णा दळे यांचा सत्कार केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे नेवासा तालुका अध्यक्ष श्री योगेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू दळवी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मुनीर तांबोळी,महाराष्ट्र राज्य सचिव हरीशदादा चक्रनारायण, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय भोसले, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव तांबे सर, ज्ञानेश्वर राऊत, आप्पासाहेब राऊत,सोमनाथ राऊत, कचरू बोरुडे, यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....