कोरडगाव येथे सरपंच श्री रवींद्र (भोरू)मस्के यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.

कोरडगाव येथे सरपंच श्री रवींद्र (भोरू)मस्के यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ.
 (प्रतिनिधी:- पाथर्डी)
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील युवा नेते व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष यांचा अभिष्टचिंतन सोहळा परिसरातील संत महात्म्यांच्या आणि अनेक राजकीय मंडळींच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी ह भ प राम महाराज झिंजुरके जोग महाराज संस्थान आखेगाव, ह भ प रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान, ह भ प लक्ष्मण महाराज भालेकर, ह भ प नवनाथ महाराज राऊत यांच्यासह वं.ब.आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर, जी. प. सदस्य हर्षदा ताई काकडे, नेवासा येथील युवा नेते बिट्टू भाऊ लष्करे, माजी नगरसेवक तुकाराम भाऊ पवार, पत्रकार रमेश अण्णा जोशी, जामखेड चे नगरसेवक मोहन पवार, प्यारेलाल भाई शेख, सरपंच रंजीत बेळगे, अर्जुन धायतडक, महेश पवार, भाऊसाहेब मासाळकर, कृष्णा धायतडक, विनायक गुरुजी देशमुख, पमासाहेब देशमुख कोरडगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व कोरडगाव, मुख्यकरवाडी, औरंगपूर, तोंडोळी, सोनोसी, जिरेवाडी, कोळसांगवी, कळस पिंपरी, निपाणी जळगाव, पागोरी पिंपळगाव, दूले चांदगाव, आगासखंड, वाळुंज, बोधेगाव, शेवगाव या ठिकाणचे अनेक ग्रामस्थ आणि तरुण मित्र यावेळी उपस्थित होते.
रवींद्र मस्के यांनी अतिशय संघर्षातून, समाजकार्यातून तालुक्यात आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले. धुरंदर आणि मुत्सद्दी राजकारणी रविंद्र शेठ मस्के यांच्यासारख्या असावा असे मत चव्हाण सर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प रामगिरी महाराज यांनी भोरू शेठ मस्के यांना वै.गुरुवर्य सत्य विजय बाबा यांचा आशीर्वाद आहे. सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो. त्यांचं भविष्य उज्वल होवो असे आशीर्वाद दिले. यावेळी उपस्थित संत महात्म्यांचे संत पूजन करण्यात आले. यावेळी अनेकांनी अभिष्टचिंतनाचा निमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी रवींद्र शेठ मस्के यांनी उपस्थित यांचे आभार मानताना आपले मनोगत व्यक्त केले. कोरडगाव आणि परिसरातील जनतेने आजपर्यंत माझ्यावर भरभरून प्रेम केलेले अशीच साथ सर्वांनी यापुढील काळातही जनतेचे हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात त्यानिमित्त दिवसभर विविध उपक्रम पार पडले.कोरडगाव गणातील सर्व जिल्हा परिषद शाळेत खाऊन चे वाटप करून तसेच विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करून बक्षीस वितरण करण्यात आले

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....