शुक्रवार 01 सप्टेंबर 2023 रोजी राहुरी येथे बहुजन ह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या

चलो राहुरी - चलो राहुरी -चलो राहुरी 
      शुक्रवार 01 सप्टेंबर 2023 रोजी राहुरी येथे बहुजन ह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली  होणाऱ्या 
"बहुजन अल्पसंख्याक जनआक्रोश" महासभेस शेवगाव पाथर्डी,नेवासा,तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महीला आघाडी,विद्यार्थी तरूणांनो बहुजन अल्पसंख्याक जनआक्रोश महासभेस   उपस्थित रहा..!


आपल्या भारत  देशातील सध्याची परिस्थिती व देशातील प्रत्येक राज्यातील परिस्थिती आज बघितली 
तर सत्ताधारी सरकारच्या नेतृत्वात देशातील वाढलेली हुकूमशाही देशातील संविधानिक लोकशाही नष्ट करत आहे. मणिपुर येथे आदिवासी स्त्रीयांची उघडी धिंड काढली जाते.तसेच महाराष्ट्रात जातीय,धार्मिक दंगली घडत आहेत. याशिवाय अल्पसंख्याक समाजातील धर्मगुरूवंर  होणारे हल्ले.या सर्व गोष्टी  दलित ,आदिवासी मुस्लीम ,ख्रिश्चन इ.बहुजन समाजातील घटकांना भयभीत करणारे व प्रचंड भयावह स्थितीत जगण्यासाठी भाग पाडणारी परिस्थिती सत्ताधारी सरकारने तयार केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण केली गेली आहे.ख्रिश्चन पास्टरवरील हल्ला,मुस्लीम समाजाचे धार्मिक स्थळ असलेल्या मस्जिदीची तोडफोड,ज्येष्ठ,मौलाना तसेच धर्मगुरुंना मारहाण,मुस्लिम पत्रकार यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब देचा वापर करून केलेला हल्ला. आदिवासी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करणे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे,श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील दलित तरूणांना चोरीच्या संशयावरून झाडाला लटकवून केलेली मारहाण या सर्व घटना बहुजन समाजात दहशत पसरवून मनूस्मृती निर्मित राज्य  रूजू करण्याचे षडयंत्र आहे.मनुस्मृतीनुसार शिक्षणाचा आधिकार शुद्रातिशुद्राला नसतो.ही उतरंड मोडून या विरोधात लढणारे व  शिक्षणाची ज्ञानपरंपरा बहुजनांना खुली करून देणारे गौतम बुद्ध, भगवान महावीर, महमंद पैगंबर,येशु ख्रिस्त, गुरूवर्य एकलव्य, संत नामदेव,संत तुकोबाराय, राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,धरणीआबा बिरसा मुंडा ,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले ,अहिल्याबाई होळकर ,छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे,अमर शेख,या सर्व महामानवानी खुली केलेली शिक्षणाची ज्ञानपरंपरा अशा घटनेतून सत्ताधारी सरकार नष्ट करू पहात आहे.अशा घटना समताधिष्ठित व धर्मनिरपेक्ष असलेल्या राज्यात घडवून दलित आदिवासी अल्पसंख्याक यांच्यावर शिक्षण बंदी घालणे नव्हे नव्हे  तर शिक्षणापासुन त्यांनी अलिप्त रहावे याच जाणिवेतून या घटना घडवलेल्या जाणवत आहे.
 अहमदनगर जिल्हा ही संताचीभुमी आहे,जात,धर्म,विरहीत  एकात्मता व संविधानिक धर्मनिरपेक्षता या मुल्यावर प्रचंड विश्वास ठेवून सर्व बहुजन आज पर्यत एकात्मता या भावनेने शांततेने एकोप्याने जीवन जगत आले आहे हिंदू मुस्लीम संबध कधीच वादात बिघडले गेले नाही.मग आता २०२४ लोकसभा  निवडणूकीच्या विजयासाठी आपल्या समतावादी व शांतताप्रिय अहमदनगर जिल्ह्यात, महाराष्ट्रात हा धर्माचा, जातीचा धुडगूस कोण घालतोय ?हे आम्ही ओळखून आहे.आमची शिक्षणाची ज्ञानपरंपरा कोण खंडित करतोय याचे आत्मभान आता आम्हाला आले आहे.
 अहमदनगर जिल्ह्यात
 पुन्हा समता पेरण्यासाठी शुक्रवार 
१ सप्टेंबर रोजी राहुरी येथे  होणाऱ्या बहुजन अल्पसंख्याक जनआक्रोश महासभेस या निवेदना द्वारे विद्यार्थी तरूणांना या महासभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहोत ,या होणाऱ्या विराट महासभेस बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहे

                   कळावे
              आपले विश्वासू

         शेवगाव -पाथर्डी -नेवासा
         वंचित बहुजन आघाडी,
         नेवासा तालुका अध्यक्ष,
         हरिशदादा चक्रनारायण

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....