अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे आश्वासनानंतर रिक्षाचालक संघटनेचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित!
अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याचे पोलिस निरिक्षक महेश पाटिल यांचे आश्वासनानंतर रिक्षाचालक संघटनेचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित!
(नेवासा शहर,तालुका नेवासा १६/०१/२०२६)
केंद्रीय लोकशाही न्युज :- नेवासा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात नेवासा तालुका रिक्षाचालक संघटनेच्या वतीने दि.१५/०१/२०२६ रोजी नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.
परवाना नसलेली वाहने खुलेआम प्रवासी वाहतूक करत असल्यामुळे परवानाधारक रिक्षाचालकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून, त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष यांनी केला आहे.
या आंदोलनाची दखल घेत संबंधित पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पाटील साहेब यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अवैध प्रवासी वाहतुकीवर तातडीने कारवाई करण्यात येईल तसेच नियमित तपास मोहीम राबविली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले.पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनामुळे सुरू असलेले आमरण उपोषण सध्या तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत वालतुरे, सचिव योगेश काळे, उपाध्यक्ष गंगाराम नवसे, विद्यमान नगरसेवक अकुश म्हस्के . तसेच माजी अध्यक्ष श्रीपतराव दांरुटे, माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक सचिन नागपुरे,नगरसेवक अनिल पवार, बाळासाहेब निकम, श्रीनिवास डहाळे, गंगाराम दगडे, भाऊसाहेब डाके, रमेश गायकवाड, किरण डाके, दिनेश सरगेये, संजय पोकळे, कुंडलिक लष्करे निलेश दारुंटे, प्रमोद काळे, मोहन जाधव, सचिन मस्के, आरिफ पठाण ,दिनेश लष्करे, युसुफ इनामदार, सोमा गोरे, मुन्ना पठाण ,कैलास धारकर, सलमान शेख ,सतीश बोर्डे, संदीप घोरपडे, इकबाल सय्यद अमन मंसूरी यांच्यासह अनेक रिक्षाचालक आंदोलनात सहभागी झाले होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पोलिसांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास तसेच अवैध प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू राहिल्यास भविष्यात पुन्हा आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता प्रत्यक्ष कारवाई करून परवानधारक रिक्षाचालकांना न्याय द्यावा,अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
सामाजिक नेते हरिशदादा चक्रनारायण यांनी या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला व आपण रिक्षा संघटने बरोबर आहे व आपले स्थरावर याचा पाठपुरावा करु असे म्हंटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा