कुकडी साखर कारखान्या विरोधात नेवासा तहसील कार्यालयावर भर पावसात टेम्पोत बसून शेतकऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच.
श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्या विरोधात नेवासा तहसील कार्यालयावर भर पावसात टेम्पोत बसून शेतकऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच.
नेवासा दि.१७/०८/२०२५
कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून २०२३-२४ च्या गळीत हंगामातील उसाचे पैसे न मिळाल्याने आणि वारंवार पाठपुरवठा करूनही कारखान्याने केवळ आश्वासन देऊन नंतर फसवल्यामुळे या विरोधात १५ ऑगस्ट २०२५, पासून नेवासा तहसील कार्यालयासमोर पिडीत शेतकरी
१)संजय केशव नागवडे,
२)लक्ष्मीबाई केशव नागवडे,
३) मच्छिंद्र रावसाहेब गवळी या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अनेक संघटनांनी तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उपोषण करते शेतकरी संजय केशव नागोडे तसेच मच्छिंद्र रावसाहेब गवळी यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला.
उपोषणकर्त्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले होते की कुकडी सहकारी साखर कारखान्याने आमच्या उसाचे थकीत पेमेंट त्वरित न केल्यास १५ ऑगस्ट रोजी नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू परंतु याकडे जाणीवपूर्वक मा.प्रादेशिक संचालक साहेब (साखर)अहिल्यानगर. यांनी दुर्लक्ष केल्यामुळे उपोषण करते हे १५ ऑगस्ट २०२५ रोजी नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
यावेळी शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले यांनी त्वरित शेतकऱ्यांची थकलेले पेमेंट करावेत अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट बुडविणाऱे कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ व प्रशासन जबाबदार राहील असे म्हटले आहे.
बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी हरीशदादा चक्रनारायण यांनी तहसीलदार यांना फोन लावून संबंधित कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ तसेच प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग अहमदनगर या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित बोलावून घेऊन पीडित शेतकरी यांचे म्हणून ऐकून उसाचे थकीत पेमेंट त्वरित अदा करण्यासाठी तोडगा काढावा असे सुचविले.
जर नेवासा तालुक्यातील पिढीत शेतकऱ्यांचे प्रती टन २८०० रु.ऊसाचे दर ठरल्या प्रमाणे त्वरित पीडित शेतकऱ्यांना न दिल्यास बहुजन समाज पार्टी व विविध संघटनांच्या वतीने कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य गेटवर जन आंदोलन करण्याचा इशारा बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी, मा.हरीशदादा चक्रनारायण यांनी दिला आहे.
या अगोदरच शेतकऱ्यांच्या गाळप ऊसाचे पैसे थकवल्याने श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याकडून (कुकडी)
२१ कोटी ३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी साखर आयुक्तांनी (Commissioner of Sugar) कारखान्याची जंगम,स्थावर मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांना देय रक्कम (Amount Due) अदा करण्याचे आदेश (आरआरसी) दिले होते.त्यासाठी पुर्व जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले होते.
१५ कोटी ६३ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी
सर्वाधिक थकबाकी असलेल्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कारखान्याच्या‘आरआरसी' चा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालकांनी आयुक्तांकडे पाठवला होता.
त्यावेळी ही थकबाकी २१ कोटी रुपयांवर गेली होती. त्यावर आयुक्तांकडे सुनावणी झाली.
कारखान्याला म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर कारखान्याने शेतकऱ्यांची काही रक्कम अदा केली.
मात्र सध्या १५ कोटी ६३ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी बाकी होती.त्याचे पुढे काय झाले माहीती नाही
याशिवाय त्यावर १५ टक्के व्याजदर आकारला जाणार होता.
कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता ताब्यात घेणार होते,कारखान्यानी शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यामुळे ही रक्कम कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊन त्यावर शासनाचे नाव लावून, कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून, साखर, मोलॅसिस व इतर उत्पादने जप्त व विक्री करून त्यामधून ही रक्कम वसूल करावी असा, आदेश साखर आयुक्तांनी दिला होता.त्याची त्वरित अंमलबजावणी करावी असेही हरिशदादा चक्रनारायण यांनी म्हंटले आहे.
यावेळी काँग्रेसचे अंजुम पटेल,विराट प्रतिष्ठानचे प्रवीणभाऊ सरोदे,बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी हरीशदादा चक्रनारायण, बहुजन समाज पार्टीचे नेवासा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर साठे,शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले,पत्रकार रमेश राजगिरे, दिघीचे चेअरमन दादा पाटील निकम,शेतकरी संघटनेचे दादा पाटील चिमणे, शेतकरी संघटनेचे बाबासाहेब नागोडे,दिघीचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव नागोडे, दिघीचे उपसरपंच रमेश गवळी,बशीरभाई पठाण,रामेश्वर नागोडे,दळूभाऊ निकम,अण्णाभाऊ अवताडे,प्रल्हाद चव्हाण,नंदू नागोडे, सुभाष बांदल,संदीप सुसे,रावसाहेब नागोडे, बाबासाहेब चव्हाण,सचिन देवदत्त हुसळे,आदिनाथ औताडे,संभाजी नागोडे,आदी पाठिंबा देत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे
उत्तर द्याहटवा