नेवासा भूमी अभिलेख कार्यालयावर नेवासा व नेवासा फाटा येथील व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा.
नेवासा भूमी अभिलेख कार्यालयावर नेवासा व नेवासा फाटा येथील व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा.
नेवासा प्रतिनिधी दि. २१/०२/२०२५,
नेवासा:मुकिंदपुर येथील पाटबंधारे विभागाच्या चारीवरील अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या चुकीच्या मोजणी विरोधात आज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येथील व्यापाऱ्यांनी आज भूमी अभिलेख कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयासमोरच आंदोलन केले.
सविस्तर वृत्त असे की मुकिंदपुर हद्दीतील डीवाय तीन पासून पावन गणपती पर्यंत सब मायनेर दोन्ही जाते गेल्या वीस वर्षापासून ही चारी बंद अवस्थेत असल्यामुळे याच्यावर स्थानिक लोकांकडून अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमण काढण्याची मागणी झाल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून या चारीवरील अतिक्रमण काढण्यासाठी हालचालीस जोरात सुरुवात करण्यात आली.
भूमी अभिलेख कार्यालयाकडून या चारीची हद्द मोजणीची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली परंतु ही मोजणी करताना मूळ अधिग्रहण केलेल्या नकाशानुसार न करता मूळचारीची हद्द बदलून मोजणी करण्यात आली.त्यामुळे अगोदर करण्यात आलेल्या मोजणी पेक्षा वेगळी मार्किंग करण्यात आली,त्यामुळे सगळ्याच व्यापाऱ्यांना या अतिक्रमणात ओढण्यात आले त्यामुळे येथील व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.
चुकीच्या पद्धतीने केलेल्या मोजणीच्या विरोधात भूमि अभिलेख अधिकाऱ्यांच्या विरोधात सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत काँग्रेस प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा फाटा येथील भूमी अभिलेख कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला व दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले .
यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर आक्षेप घेत आर्थिक तडजोडी करून या चुकीच्या मोजणीचा घाट घालण्यात आला आहे असे आरोप यावेळी व्यापाऱ्यांकडून करण्यात आले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी काँग्रेस पक्ष हा व्यापाऱ्यांच्या पाठीशी ठामपणाने उभा असून एकाही व्यापाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही असे स्पष्ट केले.
अंजुम पटेल यांनी चुकीची मोजणी करण्यामागे आर्थिक तडजोडच कारण आहे.चुकीची मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरच धडा शिकवणार तर महिला काँग्रेसच्या शोभा पातारे यांनी सरकारला धारेवर धरत निवडणुकीत यांना मतदान केल्याचे ही बक्षीस व्यापाऱ्यांना या सरकारने दिले आहे.असा घनाघात केला.
यावेळी पाटबंधारेचे उपअभियंता अक्षय कराळे, व भूमि अभिलेख अधिकारी यांनी उपस्थित आंदोलनास संबोधित करत नव्याने मोजणी करून नियमांमध्येच मार्किंग केले जाईल व कुठल्याही प्रकारे नियमबाह्य अतिक्रमण काढले जाणार नाही याची हमी दिली.
तुझ्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले यावेळी जिल्हा काँग्रेसचे संदीप मोटे,आपचे प्रवीण शिरोडकर,बसपाचे हरिश चक्रनारायण,आयन पिंजारी,सचिन गायकवाड, हरि डुकळे,भैया पटेल, शरीफ शेख,गुलाब पठाण, संतोष ससाने, विकास गवळी,महादेव नन्नवरे ,जब्बार शेख, शाहरुख कुरेशी, सादिक शेख,बादल परदेशी आदी सह असंख्य व्यापारी उपस्थित होते,
यावेळी बसपाचे युवा नेते हरिशदादा चक्रनारायण यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा