गावातील सर्व शेत-पानंद रस्ते व शिवरस्ते खुले करण्याचा पिचडगाव ग्रामसभेचा निर्णय.
गावातील सर्व शेत-पानंद रस्ते व शिवरस्ते खुले करण्याचा पिचडगाव ग्रामसभेचा निर्णय.
दि.१४/०२/२०२५ केंद्रिय लोकशाही न्युज.
पिचडगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव करण्यात आला की मौजे पिचडगांव येथील शेती -पानंद रस्ते व शिव रस्ते खुले करण्यात यावीत,
पिचडगाव मध्ये गावकरी व शेतकरी यांना आपल्या स्वतःच्या शेतामध्ये व घरामध्ये जाणे येणे ही कठीण झाले आहे कारण गावातील शेत व पानंद रस्ते व शिव रस्ते यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने व झाडे झुडपे व काटेरी गवत वाढल्याने जाणे येणे साठी गावकरी व शेतकऱ्यांची मोठी कसरत होत आहे याबाबत गावातील शेतकरी व गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला की गावातील सर्व पानंद रस्ते शिवरस्ते खुले करण्यात यावेत जेणेकरून गावातील रहिवासी व शेतकरी यांना आपापल्या शेतामध्ये जाण्या येण्यासाठी मार्ग मोकळे होतील त्यामुळे पिचडगाव ग्रामपंचायतने ग्रामसभेमध्ये सर्वानुमते असा ठराव पास केला की गावातील पानंद रस्ते व शिवरस्ते खुले करावीत. याविषयी मौजे पिचडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी नेवासा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
यावेळी झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक पी. बी. लबडे,सरपंच सौ. उषाताई हजारे, उपसरपंच संदिप गव्हाणे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा