महायुतीच्या हळदीकुंकुवाच्या कार्यक्रमाला नेवासात उत्स्फूर्त प्रतिसाद.
महायुतीच्या हळदीकुंकुवाच्या कार्यक्रमाला नेवासात उत्स्फूर्त प्रतिसाद.
30/01/2025 रोजी नेवासा तालुका महायुतीच्या वतीने तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा कार्यक्रम नेवासा फाटा येथील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे आमदार सौभाग्यवती रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाप्रसंगी सौ धनश्रीताई सुजय दादा विखे व शिवसेनेच्या नाशिक जिल्हा प्रवक्त्या व लाडकी बहीण योजनाउत्तर महाराष्ट्र समन्वयक सौ संगीता ताई नेव्हीड खोडाना प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तालुक्यातील असंख्य महिलांनी परिसर अगदी दुमदमावून टाकला होता लाडक्या भावाचे पहिलेच प्रेम बहिणींना तालुक्यात पाहायला मिळाले असंख्य महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रम प्रसंगी बोलताना धनश्री ताई विखे पाटील बोलताना म्हणाले की महिलांच्या सर्व योजना व सुख सोयीसाठी मी स्वतः आपल्या मागे खंबीरपणे उभे असून येणाऱ्या काळात तालुक्यातील महिलाना पाठबळ देऊन महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना म्हणाल्या.
त्यानंतर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री विठ्ठलराव लंघे यांनी आपल्या मनोगतात आपला राजकीय प्रवास व गोरगरीब जनतेने लाडक्या बहिणीने दिल्यालेआशीर्वाद यामधून उतराई होण्याचा व लाडक्या बहिणी मागे खंबीरपणे उभा राहण्याचा शब्द तालुक्याचे आमदार यांनी सर्व लाडक्या बहिणींना दिला. व सर्व लाडक्या बहिणीचे आभार मानले. त्यानंतर डॉ. तेजश्री ताई लंघे यांनी बोलताना महिलांच्या प्रश्नाविषयी व लाडक्या बहिनीला नेवासा तालुक्यात लाडक्या भावाचे खरे प्रथम पहायला मिळाले. त्यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम श्री विराज शिंदे दिग्दर्शक अभिनेता यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्पर्धा व खेळ उत्साहात पार पडल्या अनेक महिलांनी विविध बक्षिसे घेऊन आनंद व्यक्त केला. सौ रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे यांनी उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव अमृता ताई नळकांडे, वैद्यकीय आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्ष डॉ. मनिषा ताई वाघ अनिताताई शिंदे भाजपा महिला आघाडीच्या डॉ विद्या कोलते, शिवसेनेच्या तालुकाध्यक्ष शोभाताई आलवणे शहराध्यक्ष पुष्पाताई मीरपगार, मंगलाताई काळे, आदी भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य सचिव, मा.हरिशदादा चक्रनारायण, बातमी व जाहीरातीसाठी संपर्क:-8856964252
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा