अमृतसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपींवर कठोर कारवाईची आर.पि.आय.(आ.)ची मागणी.

दि.२९/०१/२०२५ नेवासा खु.  अहिल्यानगर.
प्रतिनिधी:- हरिशदादा चक्रनारायण.
 (तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ धायजे व पदाधिकारी नेवासा तहसील कार्यालयाला निवेदन देताना.)

अमृतसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी आरपिआयचे नेवासा तालुका अध्यक्ष सुशील धायजे यांची आरोपींवर कठोर कारवाईची मागणी.

अमृतसर, दि. २६ जानेवारी २०२५ रोजी अमृतसर, पंजाब येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करून विटंबना करण्यात आली.संबंधित घटना जातीय द्वेषातून घडली असून,जातीय तेढ निर्माण करणारी आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात व नेवासा तालुका अध्यक्ष सुशीलभाऊ धायजे यांच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक, जिल्हा सहकारी बँकचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

(नेवासा पोलीस निरीक्षक यांचे वतीने ठाणे अंमलदार निवेदन स्विकारतांना)

नेवासा तालुकाध्यक्ष सुशील भाऊ धायजे व संजय बनसोडे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत विटंबना करणाऱ्या समाजकंटकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.


(जिल्हा सहकारी बँकेचे पदाधिकारी यांना निवेदन देताना आरपीआयचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी.)
जिल्हा बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेत आरक्षणाची अंमलबजावणी करावी.
जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेत आरक्षण लागू न केल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वतीने आक्षेप नोंदवला आहे.
संविधानानुसार एससी, एसटी प्रवर्गाला आरक्षणाचा हक्क आहे. मात्र, भरती प्रक्रियेत त्याचे पालन होत नसल्याने आरक्षणानुसार जागा भरण्यात याव्यात, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात नेवासा तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ धायजे यांनी दिला आहे.

यावेळी आर.पि.आयचे.तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ धायजे,जि.सरचिटणीस आर.पि.आय.संजय बनसोडे, 
आर.पि.आय.ज्येष्ठ नेते,सुरेश गायकवाड ,काँग्रेस नेवासा शहराध्यक्ष अंजुम भाई पटेल,बसपा युवा नेते हरीशदादा चक्रनारायण,आरपीआय तालुका संघटक संतोष मोरे, उपसरपंच प्रवरासंगमचे नितीन भालेराव,सोमनाथ साठे,  संजय पवार,भाऊसाहेब जगदाळे,मुन्ना आतार,आयुब शेख,सचिन गोरावडे, सचिन गायकवाड, प्रकाश गायकवाड, अनिल मिसाळ, नवनाथ चाबुकस्वार, प्रशांत घोरपडे,टिल्लू गव्हाणे,बाळासाहेब जाधव,चंद्रकांत टिळेकर,शांतवन खंडागळे, देविदास राजगुरु,निखील साठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नेवासा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पहिल्या शाखेचे प्रवरासंगम येथे प्रदेशाध्यक्ष सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन.

नेवासा शहराध्यक्षपदी हरीशदादा चक्रनारायण; रिपब्लिकन सेनेत नव्या उर्जेची भर.

🚖 नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे चैन स्नॅचर महिला पकडली.