सोन्याचे दागिनेचोर दोन महिला पोलीसांच्या जाळ्यात.

         सोन्याचे दागिने चोरणा-या दोन महिला-चोर. 

News
सोन्याचे दागिने चोरणा-या दोन महिला-चोर पोलीसांच्या जाळ्यात

By Harish Chakranarayan जानेवारी २१/०१/२०२५

एसटी बसणे प्रवास करणाऱ्या महिलांच्या पिशवीतील सोन्याचे दागिने हात घालून चोरणाऱ्या महिला-चोरांचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे.

बुधवार दि. 8 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मीरा मच्छिंद्र डेंगळे वय 65 वर्ष रा. लोणी ता. राहता या लोणी प्रवराला जाण्यासाठी भगवानगड ते नाशिक या बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील 42 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी व डोरले कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरले. या बाबत पोलीस ठाणे नेवासा येथे मीरा डेंगळे यांनी फिर्याद दाखल केली होती, या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. अजय साठे, पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, किरण पवार यांनी हाती घेतला होता.

या अनोळखी संशयित महिला चोरांबाबत बाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपासा दरम्यान तातडीने नेवासा बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता नागरिकांनी माहिती दिल्याप्रमाणे संशयित महिला दिसून आल्या होत्या. संशयित महिलांची ओळख पटवण्यासाठी नेवासा पोलिसांनी मागील सात दिवस नेवासा ते श्रीरामपूर बस स्थानकापर्यंत पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली तसेच त्या रहात असलेल्या ठिकाणापर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून नावे निष्पन्न केली. नेवासा पोलीस सदर संशयित महिलांच्या घरा पर्यंत पोहोचताच व पोलिसांना पाहताच कावऱ्याबावऱ्या झाल्या त्यांना नेवासा बस स्थानकातील चोरी बाबत विचारपूस केली असता सुरुवातीला नकार दिला परंतु पॉलिसी खाक्या दाखवण्याची भिती घालताच नेवासा बस स्थानक येथे सोन्याचे दागिने चोरी केले बाबत कबुली दिली. तसेच फिर्यादी महिलेचे चोरलेले सोन्याचे दागिने काढून दिले. सदर 1.कांताबाई कमल लोंढे व 2.सरस्वती दत्तू खंडारे दोन्ही रा. अशोक नगर, श्रीरामपूर या महिलांना ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही केली आहे.

यापूर्वी देखील नेवासा बस स्थानक येथून चोरीच्या घटना घडलेल्या आहेत या घटनेमध्ये या अटक आरोपी महिलांचा काही संबंध वगैरे आहे का याचा देखील पोलिस तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नेवासा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पहिल्या शाखेचे प्रवरासंगम येथे प्रदेशाध्यक्ष सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन.

नेवासा शहराध्यक्षपदी हरीशदादा चक्रनारायण; रिपब्लिकन सेनेत नव्या उर्जेची भर.

🚖 नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे चैन स्नॅचर महिला पकडली.