उत्कृष्ट कार्याबद्दल नेवासा पोलीस निरीक्षक यांचा काँग्रेस व बसपा कडून सन्मान.
उत्कृष्ट कार्याबद्दल नेवासा पोलीस निरीक्षक यांचा काँग्रेस व बसपा कडून सन्मान.
दि.१४-०१-२०२५ नेवासा खुर्द.
उत्कृष्ट कार्याबद्दल नेवासा पोलीस निरीक्षक यांचा काँग्रेस व बहुजन समाज पार्टीकडून सन्मान.
(नेवासा प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यात एक वर्षाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचा नेवासा तालुका काँग्रेस पक्ष व बहुजन समाज पार्टीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
एक वर्षांपूर्वी नेवासा पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यानी कार्यभार स्वीकारला त्यावेळी नेवासा तालुक्यात चोरी, अवैध धंदे यामध्ये मटका, गुटखा, मावा,वाळू तस्करी, अवैध शस्र, असे अनेक आव्हाने समोर होती. परंतु कार्यभार स्विकारल्यानंतर कठोर भूमिका घेत यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न केला यातून नेवासा तालुक्यातील गुन्हेगारीस मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात यश आले आहे.
तालुक्यात चोरी, घरफोडी, अवैध धंदे, मटका, गुठाखा, अवैध दारू, गुन्हेगारी यांचे प्रमाण कमी झाले आहे,
तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चोख बंदोबस्त व सुरक्षेचे योग्य नियोजन पो.नी.जाधव यांनी पार पाडत निर्भय वातावरणात निवडणूक यशस्वी पार पाडल्या.तर पाचेगाव खून खटल्याचा अवघ्या आठच दिवसात शोध लावण्याचे स्रेय जाधव यांना जाते.
नेवासा तालुक्यात चोरी, गुन्हेगारी यांचे प्रमाण गेल्या वर्षी पेक्षा पन्नास टक्क्यावर आणण्याचे स्रेय जाधव यांना जाते.
पोलीस प्रशासनातील दांडग्या अनुभवाचा फायदा नेवाशातील जनतेसाठी जाधव यांनी करून पोलीस दलासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
नेवासा तालुक्याच्या एक वर्षाच्या कालावधीत जाधव यांनी केलेल्या कामगिरी बद्दल नेवासा शहर काँग्रेस व बसपा कडून जाधव यांचा शालगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे, काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल,अध्यक्ष आण्णासाहेब पटारे, बसपाचे युवा नेते हरीश चक्रनारायण,बसपाचे विकी बनकर, हरून जहागीरदार, मराठा सेवा संघांचे रावसाहेब घुमरे, कैलास बोर्डे, आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा