शेवगाव दंगलीचा आकसबुद्धीने माझ्यावर खोटा गुहा दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करा. प्रा. किसन चव्हाण यांची जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे तक्रार अर्जाद्वारे मागणी.

शेवगाव दंगलीचा आकसबुद्धीने माझ्यावर खोटा गुहा दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करा. 

        प्रा. किसन चव्हाण यांची जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे तक्रार अर्जाद्वारे मागणी.

अहमदनगर (प्रतिनिधी) :- शेवगाव दंगल प्रकरणाची सखोल व निपक्षपातीपणे चौकशी करावी. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात निश्चितच  कडक कारवाई करावी परंतु या गुन्ह्यात माझा  कोणताही संबंध नसतांना फक्त आकसबुद्धीने आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या दबावाखाली जाऊन  माझ्यावर दंगलीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक विलास पुजारी ,डी वाय एस पी संदीप मिटके,डी वाय एस पी अजित पाटील आणि पाथर्डी चे पी आय संतोष मुटकुळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

  सोमवारी सायंकाळी त्यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केला यावेळी त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे ॲड. डॉ. अरुण जाधव , ॲड. दिपक शाममदिरे, ॲड. कुणाल सरोदे, ॲड. योगेश गुंजाळ, जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, जीवन पारधे, मारुती पाटोळे, अनिल जाधव, डॉ. जालिंदर घिगे, रवींद्र म्हस्के, बन्नो भाई शेख, अरविंद सोनटक्के, प्रकाश भोसले, , संगीता ढवळे ,सुनीता जाधव, जयश्री बरकडे ,राजुभाई शेख,सोपान भिंगारे आदी उपस्थित होते. 
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन 
प्रा. किसन चव्हाण यांना दिले. 

  त्यांना दिलेल्या निवेदनात व पत्रकार परिषद मध्ये बोलतांना प्रा. किसन चव्हाण म्हटले की, शेवगावचे जातीयवादी  पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आपल्या दिड वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या अकार्यक्षम कारभाराच्या व प्रचंड अवैध धंदे  विरोधात वंचित बहुजन आघाडीने  शेवगाव  तालुक्यात अनेक वेळा मोर्चे व आंदोलने केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून, कट रचून पूर्वग्रह दूषित भावनेने मला शेवगाव दंगलीच्या गुन्ह्यात अडकवले  वास्तविक पाहता शेवगाव मध्ये दंगल घडली तेव्हा मी औरंगाबादला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो रात्री मी 10 वाजता शेवगाव ला घरी पोहोचत होतो  तेव्हा पाथर्डी चे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी मला फोन करून," सर तुम्ही शिवाजी चौकात या आपण दंगल शांत करु ,मी त्यांना म्हणालो मी आता घरी पोहचतोय तर ते म्हणाले पदाधिकारी याना पाठवा मग मी तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख यांना पाठवले 
   
  दुसऱ्या दिवशी मी शेवगाव पोलीस स्टेशनला गेला तेव्हा तिथे पी आय विलास पुजारी ,डी वाय येस पी संदीप मिटके डी वाय एस पी अजित पाटील उपस्थित होते त्यांना मी म्हणालो पी आय संतोष मुटकुळे यांनी मला रात्री फोन केला तेव्हा मी आमचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख यांना दंगलीच्या ठिकाणी पाठवले आणि तुम्ही त्यांनाच आणून आत मध्ये ठेवले आहे दोषीवर कारवाई झालीच पाहिजे परंतु मदत करणाऱ्या लोकांना या गुन्ह्यात आकस बुद्धीने अडकू नका या दंगलीला सर्वस्वी विलास पुजारी जबाबदार आहेत मी काल दिवसभर औरंगाबादला होतो त्यामुळे रात्री मुटकुळे यांचा फोन आल्यामुळे प्यारेलाल भाई यांना पाठवले आहे त्यावेळेस डीवायएसपी संदीप मिटके व डीवायएसपी अजित पाटील यांनी कोणावरही अन्याय होणार नाही चौकशी करतो आणि त्यांना सोडून देतो असा शब्द दिला

 त्यानंतर शेवगाव चे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी बाहेर येऊन मला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली डी. वाय. एस. पी. संदीप मिटके व अजित पाटील यांच्या कडे माझी तक्रार करतो का ? निट नोकरी कर ,आमची बरोबरी करतो का ? आमदारकीला उभा राहिला म्हणजे आमदार झाला का ? तुझ्या नशिबाने तू मागे २-३ वेळा माझ्या कचाट्यातून वाचलास नाहीतर तुझा कार्यक्रम झाला असता ,आता तुला सोडणार नाही अशा भाषेत दमदाटी केली त्यावर मी कुठलीही प्रतिक्रिया न देता घरी निघून आलो. 

  दुपारी दोन वाजता त्यांनीं माझे नाव आरोपी म्हणून घेतल्याचे मला समजले. वास्तविक पाहता गुन्हा घडला तेव्हा मी औरंगाबादला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तरीही जाणीवपूर्वक मला व माझ्या कार्यकर्त्यांना या दंगलीच्या गुन्ह्यात अडकवले. त्याचबरोबर शेवगावच्या अनेक निरपराध तरुणांनाही या दंगल प्रकरणात अटक केली. त्यामुळे त्यांचे करिअर बरबाद झाले आहे.

   प्रा किसन चव्हाण , पोलीस निरीक्षक विलास पुजारी ,पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व डी वाय एस पी संदीप मिटके या सर्वांचे 1 मे ते 15 मे पर्यंतचे मोबाईलचे टावर लोकेशन ,सीडीआर ,संभाषण तसेच 14 मे व 15 मे चे शेवगाव पोलीस स्टेशनचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवावे असा अर्ज प्रा किसन चव्हाण यांनी मे न्यायालय शेवगाव यांच्याकडे केला होता मे न्यायालय शेवगाव यांनी सर्वच रेकॉर्ड जतन व संग्रहित  करून ठेवावे असे आदेश दिलेले आहे 

  माझ्या वर खोटा गुन्हा दाखल करण्यास शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, डीवायएसपी संदीप मिटके  अजित पाटील व पाथर्डी चे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळेच जबाबदार आहेत. तरी त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,आपल्या अधिकारांचा गैर वापर करणे,संगनमत करून गुन्ह्यात आरोपी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी कायदेशीर मार्गाने ही लढाई लढेल असा इशारा प्रा. किसन चव्हाण यांनी दिला.
#VBAforIndia

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....