नेवासा फाटा येथे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्त्यांनी केले स्वागत...!


आदरणीय अॅड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा नेवासा फाटा येथे वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष यांनी केले स्वागत.
आज दिनांक ०९/०८/२०२३ रोजी नेवासा फाटा येथे वंचित बहुजन आघाडी,भारतीय बौद्ध महासभा,फुले शाहु आंबेडकर एकता मंच नेवासा  तालुक्याच्यावतीने स्वागत करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरिशदादा चक्रनारायण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे गंगापुर वैजापूर मार्गे श्रीरामपूर या ठिकाणी जाणार आहे असे समजताच नेवासा वंचितच्या वतीने नेवासा फाटा येथे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उभे होते यावेळी वंचित बहुज आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरिश चक्रनारायण,बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष पंडित बी.बी.,भास्कर लिहीणार मामा,सरपंच निपुंगे दादा,दळवी साहेब मुन्नाभाऊ चक्रनारायण,गणपत मोरे,श्रीकांत हिवाळे,प्रशांत बनसोडे,दिनेश चक्रनारायण,आदेश चक्रनारायण,बबलुभाऊ साळवे,जालु गोर्डे,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील कार्यक्रमासाठी जायचे असल्याने आदरणीय साहेब जास्त वेळ थांबले नाही.मात्र साहेंबाची एक झलक पाहिल्यांने सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वतावरण निर्माण झाले होते व  अंगात नवीन बळ संचारल्याचा भास होत होता असे उपस्थित कार्यकर्ते बोलत होते.

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....