प्रा.किसन चव्हाण यांनी अतिक्रमणा संदर्भात शेवगाव प्रशासनाला दिला सज्जड इशारा...

केंद्रिय लोकशाही पत्रकार संघ,
महाराष्ट्र राज्य सचिव,
हरिशदादा चक्रनारायण.
न्युज....(शेवंगाव)
दिनांक ०७/०८/२०२३
वंचित बहुजन आघाडीचा शेवगाव प्रशासनाला इशारा...!
प्रा किसन चव्हाण यांनी अतिक्रमणा संदर्भात शेवगाव प्रशासनाला दिला सज्जड इशारा...!

शेवगाव तालुक्यातील शासकीय गायरान जमीनीवरील अतिक्रमणे काढावीत अशा नोटिशी शेवगाव तहसीलदार यांनी तालुक्यातील भातकुडगाव आणि रांजणी येथील अतिक्रमण धारकांना नुकत्याच दिल्या होत्या.

   आज वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी याची तात्काळ दखल घेऊन  या दोन्ही गावातील अतिक्रमण धारकांना  सोबत शेवगाव तहसीलदार यांची भेट घेऊन मा.उच्च न्यायालय आणि शासन निर्णयाचा सखोल अभ्यास करावा आणि मगच निर्णय घ्यावा आणि नोटिसा काढाव्यात गोरगरीब लोकांना घाबरण्याचे काम करू नये ही अतिक्रमणे 1978 पासूनची आहे तीन तीन पिढया तिंथें खपल्या आहेत  त्यामुळे तिथली इंचभरही जागा किंवा तिथली मुठभरही माती कुणाच्या  बापाला देणार नाही "जो सरकारी जमीन है ...ओ जमीन हमारी हैं.!
सरकारी गायरान जमीन आमच्या हक्काची ...नाही कुणाच्या बापाची ..! असा सज्जड इशाराच प्रा. किसन चव्हाण यांनी शेवगाव तहसीलदार यांना दिला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख ,उपाध्यक्ष नितीन जाधव आणि  भातकुडगाव व  रांजणी येथील सर्व अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....