वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका ठिय्या आंदोलन नेवासा तहसील कार्यालयावर करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका ठिय्या आंदोलन नेवासा तहसील कार्यालयावर करण्यात आले.
सोमवार दि. १४/०८/२०२३ रोजी,वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुक्याच्या वतीने ठिय्या आंदोलन नेवासा तहसील कार्यालया वरती काढण्यात आले होते, यावेळी नेवासा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच एबन-एजर पास्टर फेलोशिप नेवासा तालुक्यातील प्रमुख धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या-आंदोलनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.
1) मणिपूर येथील दोन आदिवासी ख्रिश्चन महिलांची नग्न दिंढ काढणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,
2) मणिपूर येथील सरकार बरखास्त करून त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी,
3) महाराष्ट्रामध्ये विशेष अहमदनगर जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंवरती, चर्चवरती,व घरी प्रार्थनासाठी एकत्र जमले असता हल्ले करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणारे भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अहमदनगर जिल्हा बंदी करण्यात यावी व जातीय तेढ निर्माण करणे दोन समाजामध्ये वाद लावून देणे यासाठी आरोपी करून गुन्हे दाखल करण्यात यावे,
4) भारतीय राष्ट्रध्वजाचा,महापुरुषांचा,स्वातंत्र्य सैनिकांचा,अपमान करणाऱ्या व भीमा कोरेगाव दंगलीतील एक नंबरचा आरोपी मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला त्वरित अटक करून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत,
5) गायरान व शासकीय जमीन कसत असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण कायम करून गरीब शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा उतारा तयार करण्यात यावा.
6) गायरान व शासकीय निवासी अतिक्रमण कायम करून घराची उतारे तयार करण्यात यावीत.
7) नेवासा तालुक्यातील अनेक गोरगरिबांचे प्रपंच उध्वस्त करणाऱ्या अवैध धंदे, मटका,जुगार, गावठी दारू, कायम बंद करण्यात यावी.
8)नेवासा तालुक्यातील प्रत्येक हॉस्पिटल शेजारी जेनेरिक मेडिकल शक्तीने करण्यात यावीत.
9) वरखेड देवस्थान विश्वस्त पदी प्रशासक समिती नेमण्यात यावी.
10) कहार व भिल्ल समाज्यातील लोकांना मासेमारी व्यवसाय करण्यासाठी जायकवाडी धरणातील गाळपैर  २ एकर जमीन कुटुंबाच्या उदारनिर्वाह करण्यासाठी देण्यात यावी.
11) मासेमारी व्यावसायिक उद्योगासाठी क्रेडिट कार्ड देण्यात यावेत
आदी मागण्यासाठी नेवासा तहसील कार्यालयावरती ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी सूत्रसंचालन पास्टर अंकुश अडागळे यांनी केले तर वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांनी प्रास्ताविक केले व ठिय्या आंदोलनाचा हेतू व उद्देश स्पष्ट केला,
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
प्रमुख वक्ते प्राध्यापक किसनरावं चव्हाण सर,(महाराष्ट्र राज्य-उपाध्यक्ष,)
दिशाताई पिंकी शेख,( राज्य-उपाध्यक्ष,)
अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष, विशाल भाऊ कोळगे,महासचिव अनिलराव जाधव,जिल्हा उपाध्यक्ष विजय अंकल गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष पोपटराव सरोदे,नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चकनारायण, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन,पप्पू इंगळे,सुशील धायजे,सुनील वाघमारे आदी मान्यवरांची भाषणे झाली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिशा ताई पिंकी शेख या भाषणासाठी उभ्या राहिल्या आणि नेवासा शहराची लाईट बंद झाली.
तरीही त्यांचे भाषणही खूप गाजल,
(यावेळी नेवासा तालुकाध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांचे पँथरूप अनुभवयास मिळाले त्यांनी तात्काळ एम.एस.सी. बी. ऑफिसला फोन लावून पदाधिकारी यांना धमकावले व सांगितले की जर पाच मिनिटाच्या आत लाईट नाही आली तर हे ठिय्या आंदोलनकर्ते एम.एस.सी.बी. कार्यालयाला घेराव घालतील त्यानंतर आठ ते दहा मिनिटांमध्ये लाईट आली. 

वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसनरावजी चव्हाण साहेब यांनी आजी-माजी आमदारांना सखाराम- तुकारामाची उपमा देत चांगलेच फाईलवर घेतले व येत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच निवडून देत आमदार करावे असे आव्हान उपस्थित आंदोलन कर्त्यांना केले.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी नेवासा तालुक्यात विशेष लक्ष घालण्यासाठी आम्हाला सांगितले आहे,असे म्हणत राज्याचे दोन उपाध्यक्ष आज या नेवासा तालुक्यात आले आहेत असे म्हणत आजी-माजींना इशारा दिला.

56 इंचाची छाती असणारे पंतप्रधान मनीपूर जळत असताना व तेथील दोन आदिवासी ख्रिश्चन महिलांची नग्न धिंड काढताना कुठे लपून बसले होते? तेव्हा कुठे होती यांची 56 इंचाची छाती असा थेट सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रात चाचा -भतीज्याने महाराष्ट्रातील  मतदारांना वेड्यात काढण्याचा धंदा सुरू केला आहे असे म्हणत शरद पवार व अजित पवार यांच्यावरही टीका केली.
भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा व महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करणारा व माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने लेकरे होतात असे म्हणणारा मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याचाही खरपूस समाचार घेतला.
यावेळी नायब तहसीलदार चिंतामणी साहेब व पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे साहेब यांनी निवेदन स्वीकारले व उचित कारवाईचे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे व ठिय्या आंदोलनासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांनी आभार मानले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसनरावजी चव्हाण साहेब,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिशाताई शेख, वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष विशालभाऊ कोळगे,महासचिव अनिल राव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विजय अंकल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव सरोदे,नेवासा तालुकाध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण,शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन, पप्पूभाऊ इंगळे, सुशील धायजे, राष्ट्रीय ख्रिस्ती आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष पास्टर डी.बी.अमोलिक, एबन-एजर पास्टर फेलोशिपचे नेवासा तालुका उपाध्यक्ष पास्टर निलेश पाटील, सचिव पास्टर प्रशांत बनसोडे, पास्टर बी. डी. पहिलवान, पास्टर अंकुश आढागळे, पास्टर अंकुश लांडगे, पास्टर नितीन चक्रनारायण, पास्टर दिलीप सोनवणे, संतोष काळे सर, जालिंदर पंडोरे साहेब प्रदेशाध्यक्ष कहार समाज, अंतोनभाऊ गोर्डे नेवासा तालुका संपर्कप्रमुख, भाऊ गंगाधर पारखे तालुका संघटक, हरिभाऊ लष्करे एकलव्य आघाडी, संतोष मोरे एकलव्य आघाडी,रघुनाथ कुंढारे कहार समाज तालुकाध्यक्ष, इसाकभाई इनामदार, शकील भाई इनामदार, आयुब शेख, योगेश बोर्डे वंचित शाखाध्यक्ष देवसडे, उत्तम बोर्डे, ताराचंद सरोदे, जालिंदर गोरडे, ज्ञानेश्वर साठे, दयानंद साठे, बाळासाहेब कांबळे, सुनील शिंदे, गणेश भाऊ चौघुले, श्रीकांत हिवाळे, कडूबाळ ससाने, अशोकराव मिसाळ, सुरेश परे, ऍड.मोसिन खान पठाण, रावसाहेब पवार, वर्षाताई बाचकर, सोनाली ताई घोरपडे, लताबाई जाधव, कविता रानडे, सविता वंजारे, राजू चक्रनारायण, आदी. नेवासा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसील कार्यालयासमोरील वातावरण वंचितमय झाले होते.

Comments

Popular posts from this blog

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपुर येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व नेवासा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने झाल्या करोडपती...! आणि महसूल अधिकारी झाले लखपती...!

सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आयोजित केलेला निषेध मोर्चा अखेर स्तगीत....