Posts

नेवासा फाटा येथे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्त्यांनी केले स्वागत...!

Image
आदरणीय अॅड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा नेवासा फाटा येथे वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष यांनी केले स्वागत. आज दिनांक ०९/०८/२०२३ रोजी नेवासा फाटा येथे वंचित बहुजन आघाडी,भारतीय बौद्ध महासभा,फुले शाहु आंबेडकर एकता मंच नेवासा  तालुक्याच्यावतीने स्वागत करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरिशदादा चक्रनारायण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे गंगापुर वैजापूर मार्गे श्रीरामपूर या ठिकाणी जाणार आहे असे समजताच नेवासा वंचितच्या वतीने नेवासा फाटा येथे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उभे होते यावेळी वंचित बहुज आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरिश चक्रनारायण,बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष पंडित बी.बी.,भास्कर लिहीणार मामा,सरपंच निपुंगे दादा,दळवी साहेब मुन्नाभाऊ चक्रनारायण,गणपत मोरे,श्रीकांत हिवाळे,प्रशांत बनसोडे,दिनेश चक्रनारायण,आदेश चक्रनारायण,बबलुभाऊ साळवे,जालु गोर्डे,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील कार्यक्रमासाठी जायचे असल्याने आदरणीय साहेब जास्त वेळ थांबले नाही.मात्र साहेंबाची एक झलक पाहिल्यांन

वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या हस्ते देवसडे शाखेचे भव्य उद्घाटन.

Image
वंचित बहुजन आघाडी देवसडे शाखेचे भव्य उद्घाटन...! देवसडे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे गुरुवार दिनांक २३/११/२०१३.रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजता वंचित बहुजन आघाडी देवसडे शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली देवसडे शाखेची बांधणी करण्यात आली तसेच वेळोवेळी देवसडे गावाला भेटी देऊन वंचित बहुजन आघाडी या पक्षाची ध्येय व धोरणे तसेच वंचित बहुजन आघाडीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्यानंतर देवसडे शाखेची कार्यकारणी तयार करण्यात आली   २३/११/२०२३ रोजी ठीक सका.०९:०० वाजता वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन . तसेच नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण यांच्या हस्ते देवसडे शाखा पाटीचे व फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी देवसडे गावातील समस्त पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी व गावकऱ्यांना राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण, यांचेही भाषण झाले. व

विषाची बाटली कुठून आली... ??

Image
विषाची बाटली कुठून आली... ??  ------------------------------------------- कुठल्याही समाजाची ऐकी ही प्रस्थापित किंवा मुठभर सवर्णांच्या सत्तेसाठी धोक्याची घंटा असते...!!                         आक्रमक वृत्तीचा, लढाऊ बाण्याचा, आणि सत्ताधारी मानसिकतेचा समाज एकत्र येतं असेल तर मूठभर सवर्ण आणि प्रस्थापित घराणे यांच्या पोटात गोळा उठतो....!!     प्रस्थापितांना आपली सत्ता धोक्यात येते का? म्हणून भिती वाटतेय. आणि म्हणून आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या समाजात बेकी कशी निर्माण करायची म्हणून प्रस्थापित सत्ताधारी कोणत्याही स्तराला जाऊन एकत्र आलेल्या समाजात विष पेरणी करुन बेकी निर्माण करतात...!!                          देशाचा इतिहास साक्षी आहे, इथं जाती कशासाठी निर्माण केल्या. जाती जातीत अंतर्विरोध कसा उत्पन्न झाला. हा भेदनीतीचा सामाजिक इतिहास ओरडून, ओरडून सांगतोय की, मुठभर सवर्णांनी सर्व सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी चालविलेला हा खटाटोप आहे...!!      गेल्या एक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर हे संपूर्ण महाराष्ट्र पायदळी तुडवत जाहीर सभा

शेवगाव दंगल प्रकरणी पी.आय. पुजारींची चौकशी करा न्यायालयाचा आदेश...!

Image
शेवगाव दंगल प्रकरण,पी.आय. पुजारींची चौकशी करा न्यायालयाचा आदेश...! अहमदनगर, ता.२२/०३/२०२४: शेवगाव पोलीस ठाण्याची तात्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसनराव चव्हाण यांच्या विरुद्ध दंगलीचा खोटा गुन्हा दाखल केला होता,चव्हाण यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी चौकशी अर्जामध्ये जिल्हा न्यायाधीश एम.एस. लोणे यांनी पुजारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. शेवगाव 14 मे 2023 रोजी मिरवणुकीत झालेल्या दंगल प्रकरणी तात्कालीन पोलीस निरीक्षक पुजारी विलास यांनी शेवगाव शहरातील अनेक निरापराध लोकांना आरोपी म्हणून दाखवले त्यामुळे अनेकांना तुरुंगवास भोगवा लागला होता, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष चव्हाण हे दंगलीच्या दिवशी कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी होते त्यांना दंगलीच्या गुन्ह्यात आरोपी केले होते चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेऊन आपली बाजू मांडून अटकपूर्व जामीन मिळवला होता.  चव्हाण यांनी स्वतःची सर्व कॉल डिटेल्स, लोकेशन, पुजारी, मुटकुळे,तात्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, अजित पाटील यांचे 1 ते 16 मे 2023 पर्य

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण आंदोलनकर्त्यांची मध्यरात्री बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली भेट..

Image
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण आंदोलनकर्त्यांची मध्यरात्री बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली भेट.    महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचे जनक Balasaheb Ambedkar  आहेत. आता जे ओबीसींच्या नावाने टाहो फोडणारे, सत्तेची खुर्ची उबवणारे तेव्हा ओबीसींच्या विरोधात होते. मंडल कमिशन महाराष्ट्रात लागू करा म्हणून इथली आंबेडकरवादी जनता रस्त्यावर उतरून लढत होते. हा इतिहास विसरता कामा नये.  परभणी येथील ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार महासभा संपल्यानंतर पुण्याच्या सभेला जात असताना मध्यरात्री प्रवासात बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण आंदोलनकर्त्यांना भेट दिली व चर्चा केली. यावेळी त्यांच्या सोबत प्रवासात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण हे होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के,सुरेश खंडागळे,पाथर्डी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हस्के शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेखदिलिप खेडक साहेब, आंधळे महाराज, किसन आव्हाड ,रमेश गोरे,राजेंद्र दुधाळ, राजेंद्र सोनटक्के गणेश सोनटक्के दीपक गादे  महाराज,सुरेश हूलजुते, सचिन नागपुरे हनुम